ETV Bharat / state

बाजार समितीच्या वतीने उभारण्यात आलेले राज्यातील चारही कोविड सेंटर परभणी जिल्ह्यात

author img

By

Published : May 12, 2021, 8:05 PM IST

लॉकडाऊन असूनही राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी पुढे येण्याची गरज असून, कोविड सेंटर उभारण्याचे आवाहन राज्य सरकारने केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मानवत बाजार समितीने राज्यातील पहिले कोविड सेंटर उभारले आहे. मानवत पाठोपाठ जिंतूर, सेलू आणि आज पाथरी येथे देखील कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.

बाजार समितीच्या वतीने पाथरीमध्ये कोविड सेंटर

परभणी - लॉकडाऊन असूनही राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी पुढे येण्याची गरज असून, कोविड सेंटर उभारण्याचे आवाहन राज्य सरकारने केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मानवत बाजार समितीने राज्यातील पहिले कोविड सेंटर उभारले आहे. मानवत पाठोपाठ जिंतूर, सेलू आणि आज पाथरी येथे देखील कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.

पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथे 50 बेडचे सर्व सोई-सुविधांसह सुसज्ज आणि मोफत उपचार सुविधा देणाऱ्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन कृषीमंत्री दादा भुसे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने व पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या हस्ते प्रत्यक्षरीत्या झाले.

'राज्यभर परभणी पॅटर्न राबवणार'

बाजार समितीचे राज्यातील पहिले 4 कोविड सेंटर परभणी जिल्ह्याने उभारल्याबद्दल जिल्ह्याचे कौतुक करत राज्यभर परभणी पॅटर्न राबविण्यात येईल, असे गौरवोद्गार सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी काढले आहेत. तसेच यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी आमदार बाबजानी दुराणी आणि माजी आमदार विजय भांबळे यांचे अभिनंदन केले.

'कोविड सेंटरसाठी सहकार्याचे आश्वासन'

दरम्यान, कोविड सेंटर सुरु केल्याने पाथरी व परिसरातील नागरिकांना चांगल्या दर्जाची आरोग्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. आपण सर्वांनी एकजुटीने कोरोना संकटाचा सामना करायचा आहे. या कोविड सेंटरसाठी लागणारी प्रत्येक मदत व सहकार्य करण्यात येईल, असे पालकमंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन

दरम्यान कोविड सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना दादा भुसे यांनी म्हटले आहे की, कोरोना संकटात राज्य शासन युद्धपातळीवर कार्यरत आहे. सध्याचा काळ अतिशय कठीण आहे. नागरिकांनी शासनाच्या वतीने वेळोवेळी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचे पालन करावे.

हेही वाचा - दिलासादायक : नागपूर जिल्ह्याला आज रात्री मिळणार 50 हजार लसींचे डोस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.