ETV Bharat / state

शहीद जवान मोहिते यांच्यावर महागाव येथे होणार अंत्यसंस्कार

author img

By

Published : May 28, 2021, 9:10 PM IST

पठाणकोट येथील वातावरणामुळे मोहिते यांची काही दिवसांपूर्वी तब्येत बिघडली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मागील तीन-चार दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती आणखीच खालावली होती त्यामुळे अखेर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अशातच गुरुवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

Funeral on martyr mohite wil be in mahagaon
शहिद जवान मोहिते यांच्यावर महागाव येथे होणार अंत्यसंस्कार

परभणी - हवाई दलातील शहीद जवान जिजाभाऊ किशनराव मोहिते (२६) यांच्या पार्थिवावर त्यांचे मूळगावी म्हणजेच पूर्णा तालुक्यातील महागाव येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. मोहिते यांचे जम्मू येथील पठाणकोटच्या भारतीय हवाईदलाच्या तळावर काल (गुरुवारी) संध्याकाळी निधन झाले. तेथील हवामानामुळे त्यांची तब्येत बिघडली होती.

स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून हवाई दलात निवड
शाहिद जिजाभाऊ मोहिते यांचे पहिले ते सातवीपर्यंतचे शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले. तर आठवी ते दहावीचे शिक्षण खासगी शाळेत झाले होते. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पालम येथे घेतले. त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांची हवाई दलात निवड झाली होती.

गुरुवारी सायंकाळी आले वीरमरण

पठाणकोट येथील वातावरणामुळे मोहिते यांची काही दिवसांपूर्वी तब्येत बिघडली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मागील तीन-चार दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती आणखीच खालावली होती त्यामुळे अखेर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अशातच गुरुवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

पार्थीव हैदराबादमार्गे जन्मगावी येणार

मोहिते यांचे पार्थिव महागावात केव्हा दाखल होणार याबाबतची माहिती सैन्यदलाने जिल्हा प्रशासनाला दिली नाही. परंतू पठाणकोटला अखेरची मानवंदना देवून पार्थिव विमानाने हवाई दलाच्या दिल्ली स्थित मुख्यालयात आणल्या जाणार असून तिथून मानवंदना देवून पार्थिव हैदराबादमार्गे जन्मगावी म्हणजे महागाव येथे अंत्यसंस्कारासाठी आणला जाणार असल्याची माहिती वायुसेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुटुंबीयांना दिली आहे.

अंत्यसंस्काराची वेळ निश्चित नाही

महत्त्वाचे म्हणजे, मोहिते यांच्या पार्थिवावर अंत्यविधी कधी व किती वाजता होणार, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. उपजिल्हाधिकारी सुधीर पाटील व तहसीलदार पल्लवी टेमकर हे हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकारी व गावकऱ्यांच्या संपर्कात आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी तसेच दोन महिन्याची चिमुकली मुलगी आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी नांदेड जिल्ह्यातील मार्खंड या गावात त्यांचा भाग्यश्री यांच्यासोबत विवाह झाला होता. त्यानंतर अल्पावधीतच त्यांचे दुर्दैवी निधन झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा- प्रतीक्षा संपली! ५जीच्या प्रायोगिक चाचणीकरिता स्पेक्ट्रमचे दूरसंचार कंपन्यांना वाटप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.