ETV Bharat / state

राखीव पोलीस दलातील जवानाचा गडचिरोलीत संशयास्पद मृत्यू; शनिवारी अंत्यसंस्कार

जिल्ह्यातील पालम तालुक्याच्या पेंडू येथील रहिवासी असलेल्या रामदास शिवदास धुळगुंडे (३३) यांचा गडचिरोली येथे सेवा बजावताना मृत्यू झाला आहे. शनिवारी रामदास यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

author img

By

Published : May 10, 2019, 5:44 PM IST

रामदास शिवदास धुळगुंडे

परभणी - जिल्ह्यातील पालम तालुक्याच्या पेंडू येथील रहिवासी असलेल्या रामदास शिवदास धुळगुंडे (३३) यांचा गडचिरोली येथे सेवा बजावताना मृत्यू झाला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर रामदास यांचा मृतदेह कुटुंबीयांना देण्यात येणार आहे. शनिवारी मुळ गाव पेंडू येथे शासकीय इतमामात रामदास यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

रामदास शिवदास धुळगुंडे यांच्या कुंटुबावर शोककळा

रामदास हे भारतीय राखीव पोलीस दलात क्रमांक १४ चे जवान होते. गेल्या महिन्यात त्यांच्या पत्नीने जुळ्या मुलांना जन्म दिला होता. यामुळे त्यांचे कुटुंबीय आनंदात होते. परंतु, गुरुवारी रात्री रामदास यांच्या निधनाचे वृत्त येताच धुळगुंडे कुटुंबावर शोककळा पसरली. घटनेची माहिती मिळताच त्यांचे चुलते व इतर नातेवाईक गडचिरोलीकडे रवाना झाले.

रामदास यांचा मृत्यू चक्कर येवून पडल्यामुळे - पोलीस अधीक्षक

गुरुवारी गडचिरोलीच्या मुलचेरा तालुक्यातील बोलेपल्ली पोलीस मदत केंद्रामध्ये कर्तव्य बजावत असताना रामदास यांना चक्कर आल्याने ते खाली कोसळले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती नक्षल सेलचे अप्पर पोलीस अधीक्षक हरी बालाजी यांनी दिली.

मृत्यू नक्षलवाद्यांच्या हल्लात - रामदास यांच्या चुलत भावाचा आरोप

रामदास यांचे चुलत बंधू आप्पाराव धुळगुंडे यांनी मात्र रामदास यांचा मृत्यू नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात झाल्याचा दावा केला आहे. काल रात्री ते आपल्या सहकाऱ्यांसह पेट्रोलिंग करत असताना त्यांच्यावर हल्ला झाला होता. त्यात त्यांनी गाडीतून उडी मारली. त्यानंतर, हल्लेखोरांच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती त्यांच्या सहकारी पोलिसांनी घटनेनंतर दिली होती. परंतु, आता शवविच्छेदन झाल्यानंतरच खरे कारण स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया आप्पाराव धुळगुंडे यांनी दिली.

Intro:परभणी - जिल्ह्यातील पालम तालुक्याच्या पेंडू येथील रहिवाशी असलेल्या राखीव पोलीस दलातील जवानाचा गडचिरोली येथे सेवा बजावताना मृत्यू झाला आहे. या संदर्भात पोलिसांनी रामदास यांचा मृत्यू चक्कर येऊन खाली पडल्याने झाला तर त्यांच्या चुलत भावाने मात्र रामदास यांचा मृत्यू नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात झाल्याचे सांगितले. दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे मात्र त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.Body:रामदास शिवदास धुळगुंडे (३३) असे या जवानाचे नाव आहे. ते भारतीय राखीव पोलीस दलाच्या क्रमांक 14 चे जवान होते. गेल्या महिन्यातच त्यांच्या पत्नीने दोन जुळ्या पुत्रांना जन्म दिला होता. यामुळे त्यांचे कुटुंब आनंदात होते. परंतु काल गुरुवारी रात्री रामदास यांच्या निधनाची बातमी येऊन धडकली आणि कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला. ही माहिती कळताच त्यांचे चुलते व इतर नातेवाईक गडचिरोलीकडे रवाना झाले. दरम्यान, गुरुवारी ते गडचिरोलीच्या मुलचेरा तालुक्यातील बोलेपल्ली पोलीस मदत केंद्रमध्ये कर्तव्य बजावत असताना त्यांना अचानक चक्कर आली. त्यामुळे ते खाली कोसळले. येथे उपस्थित इतर पोलीस जवानांनी त्यांना उचलले असता, त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. त्यामुळे तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या संदर्भात 'त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती नक्षल सेलचे अप्पर पोलीस अधीक्षक हरी बालाजी यांनी 'ईटीव्ही भारत'च्या गडचिरोली प्रतिनिधीला दिली आहे.
तर दुसरीकडे त्यांचे चुलत बंधू आप्पाराव धुळगुंडे यांनी मात्र रामदास यांचा मृत्यू नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात झाल्याचा दावा केला आहे. काल रात्री ते आपल्या सहकाऱ्यांसह पेट्रोलिंग करत असताना त्यांच्यावर हल्ला झाला होता, त्यात त्यांनी गाडीतून उडी मारली, त्यानंतर हल्लेखोरांच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला' अशी माहिती त्यांच्या सहकारी पोलिसांनी घटनेनंतर कुटुंबाला दिली होती, परंतू आता त्या ठिकाणीचे अधिकारी शवविच्छेदन झाल्यानंतरच खरे कारण स्पष्ट होईल, असे सांगत असल्याचेही अप्पाराव म्हणाले.

"शुक्रवारी अंत्यसंस्कार"
पोलीस जवान रामदास यांचे नातेवाईक आज गुरुवारी दुपारी गडचिरोली येथे दाखल झाले आहेत. सायंकाळी त्यांना शवविच्छेदनानंतर रामदास यांचा मृतदेह ताब्यात देण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर पेंडू येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दरम्यान, रामदास याच्या मृत्यूनंतर पालम तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत:- रामदास यांचे फोटो व त्यांच्या घरचे तथा कुटुंबियांचे vis.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.