ETV Bharat / state

पैसे वाटप करताना झरीत चौघांना पकडले

परभणी तालुक्यातील झरी येथे मतदारांना मतदानासाठी पैसे वाटप करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणात 41 हजार रुपये रोख, प्रचाराचे साहित्य, मतदारांची यादी यासह 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

author img

By

Published : Jan 15, 2021, 3:16 PM IST

Updated : Jan 15, 2021, 3:24 PM IST

parbhani
parbhani

परभणी - जिल्ह्यातील 498 ग्रामपंचायतीसाठी होत असलेली मतदानाची प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. सुरुवातीच्या 4 तासात 29.79 टक्के एवढे मतदान झाले होते. दरम्यान, परभणी तालुक्यातील झरी येथे मतदारांना मतदानासाठी पैसे वाटप करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणात 41 हजार रुपये रोख, प्रचाराचे साहित्य, मतदारांची यादी यासह 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

पहिल्या चार तासातील आकडेवारी

जिल्ह्यातील 9 तालुक्यातील 498 ग्रामपंचायतींसाठी आज (शुक्रवार, 15 जानेवारी) सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. पहिल्या चार तासात जिल्ह्यात एकूण 2 लाख 107 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. याची टक्केवारी 29.79 इतकी आहे.

तालुकानिहाय मतदान

सकाळी 7.30 ते 11.30 या वेळात परभणी तालुक्यात 34 हजार 729 मतदारांनी मतदान केले, याची टक्केवारी (32.19) इतकी आहे. या प्रमाणे सेलू तालुका 21 हजार 498 (32.97), जिंतूर 28 हजार 493 (26.4), पाथरी 19 हजार 533 (36.1), मानवत 16 हजार 979 (22.6), सोनपेठ 14 हजार 597 (30।87), गंगाखेड 17 हजार 524 (19.92), पालम 18 हजार 774 (31.00) तर पूर्णा तालुक्यात 27 हजार 609 (33.27) मतदान झाले.

निवडणूक प्रशासन ठिम्म

परभणीतील निवडणूक प्रशासनाकडून माहिती गोळा करण्याची प्रक्रिया अतिशय ठिम्म चालू असल्याचे दिसून आले. दुपारी 1 वाजून 09 मिनिटांनी प्रथम मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात आली. शिवाय सकाळी साडेनऊ ते 11 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारीच माध्यमांनी दिली नव्हती. त्यानंतर थेट चार तासांची मतदानाची आकडेवारी देण्यात आली. तत्पूर्वी, निवडणूक प्रशासनाकडे वारंवार संपर्क साधूनही आकडेवारी मिळत नसल्याने प्रशासनाचा ढिसाळ कारभार पाहावयास मिळाला.

झरीत पैसे वाटताना चौघांना पकडले

परभणी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या झरी येथे नेहमीच निवडणुकीदरम्यान काही ना काही वाद होत असतात. या ठिकाणची निवडणूकदेखील चुरशीची होत असते. मात्र यावेळी या ठिकाणी चक्क नागरिकांना मतदान करण्यासाठी पैसे वाटप करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला. मध्यरात्री पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान या ठिकाणी असलेल्या बाजार परिसरात चार जणांना पकडून त्यांच्याकडून 41 हजार रुपये रोख, प्रचाराचे साहित्य आणि मतदारांची नावे लिहिलेली यादी ताब्यात घेतली. तसेच या कारवाईमध्ये पोलिसांनी खालिद सरवर कुरेशी, कचरुबा त्र्यंबकराव जगडे, किरण प्रकाशराव देशमुख आणि नारायण रामकिशन गवळी या चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केली असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अंगद मुरकुटे करत आहेत.

Last Updated : Jan 15, 2021, 3:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.