ETV Bharat / state

परभणी जिल्ह्यात आढळले नवे 10 कोरोनारुग्ण ; एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 132 वर - परभणी कोरोना रुग्ण संख्या

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून शुक्रवारी सायंकाळी परभणी शहरातील 7 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर रात्री दहा वाजल्यानंतर पुन्हा शहरातीलच काद्राबाद प्लॉट येथील 47 व 26 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल प्राप्त झाला. सद्यपरिस्थितीत जिल्ह्यातील एकूण कोरोनाबधितांची संख्या आता 132 एवढी झाली आहे.

परभणी कोरोना अपडेट
परभणी कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 4, 2020, 8:58 AM IST

परभणी - काल शुक्रवारी रात्री पुन्हा आणखी दोन महिला रुग्णांची कोरोना पॉझिटिव्ह म्हणून नोंद झाली आहे. रात्री उशिरा आलेल्या अहवालात काद्राबाद प्लॉट भागातील 47 आणि 26 वर्षीय या दोन महिलांचा अहवाल जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाला. त्यानुसार शुक्रवारी दिवसभरात परभणी शहरातील 9 आणि मानवत येथील 1 अशा एकूण 10 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सद्यपरिस्थितीत जिल्ह्यातील एकूण कोरोनाबधितांची संख्या आता 132 एवढी झाली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून शुक्रवारी सायंकाळी परभणी शहरातील 7 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर रात्री दहा वाजल्यानंतर पुन्हा शहरातीलच काद्राबाद प्लॉट येथील 47 व 26 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल प्राप्त झाला. सदर महिला यापूर्वी काद्राबाद प्लॉट मध्ये आढळून आलेल्या दोन कोरोनाबधितांच्या संपर्कात आल्या आहेत. त्यांना यापूर्वीच विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यांचे स्वॅब गुरुवारी नांदेड येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त झाला.

विशेष म्हणजे, काल शुक्रवारी मुंबई येथे स्वॅब देवून मानवत येथे वास्तव्यास आलेल्या एका रुग्णाचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला. यासंदर्भात मुंबईतील आरोग्य विभागाने परभणी जिल्हा रुग्णालयाला माहिती कळवली. त्यानुसार तात्काळ मानवत तालुक्यातील इरळद येथून सदर रुग्णाला ताब्यात घेऊन परभणीच्या कोरोना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर त्याच्या संपर्कात आलेल्या इतर नातेवाईकांना होम क्वारंटाईन करण्यात आले. त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांचे स्वॅब नांदेडच्या प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

दरम्यान, शुक्रवारी परभणी शहरातील नाथनगरातील 2, विकास नगर, काद्राबाद प्लॉट, अजिजिया नगर, पंचशील नगर व दर्गा रोड भागातील प्रत्येकी एका रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तसेच गुरुवारी 5 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या पार्श्वभुमीवर जिल्ह्याच्या नागरी भागात रविवारी मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 967 संशयितांपैकी 2 हजार 638 जणांचे स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. 88 जणांचे अहवाल अनिर्णयक असून, 47 जणांचे अहवाल तपासणीची आवश्यकता नसल्याचे प्रयोगशाळेने सांगितले आहे. याशिवाय 27 अहवाल प्रलंबित आहेत. तर जिल्ह्यात सध्या एकूण 132 कोरोनाबाधित आढळले असून, यातील चार जणांचा यापुर्वीच उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी दिवसभरात आणखी 4 बधितांना बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत 98 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे उर्वरीत 30 बाधितांवर जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना संक्रमीत कक्षात उपचार सुरु आहेत. त्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.