ETV Bharat / state

फेसबूक लाईव्ह करत तरुणाची आत्महत्या - palghar crime news

जव्हार तालुक्यातील विर्हे गावातील नवनाथ बोंगे (वय 22)  हा तरुण जव्हार येथे एका हॉटेलमध्ये काम करीत होता. गुरुवारी हॉटेलमधील काम आटोपून तो दुपारी रूमवर आला आणि त्याने फेसबूकवर लाईव्ह करीत आत्महत्या केली. या प्रकरणी जव्हार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास चालू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अप्पासाहेब लेंगरे यांनी दिली.

Young man commits suicide by doing Facebook live
फेसबूक लाईव्ह करीत तरुणाची आत्महत्या
author img

By

Published : Aug 7, 2020, 5:18 PM IST

पालघर - जव्हार तालुक्यातील विर्हेगाव येथील एका 22 वर्षीय तरुणाने फेसबूक लाईव्ह करून पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून या प्रकरणी जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालघर जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील जव्हार तालुक्यातील विर्हे गावातील नवनाथ बोंगे (वय 22) हा तरुण जव्हार येथे एका हॉटेलमध्ये काम करीत होता. हॉटेल जवळील परिसरात तो एका खोलीत काही सहकाऱ्यासोबत राहत होता. गुरुवारी हॉटेलमधील काम आटोपून तो दुपारी रूमवर आला आणि त्याने फेसबूकवर लाईव्ह करीत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून त्याचा मृतदेह शवविच्छेदनसाठी जव्हार येथील पतगशहा कुटिर रुग्णालयात पाठविला. सदर तरुण हा वाडा तालुक्यातील विऱ्हे गावातील रहिवासी असल्याची माहीती आहे. या प्रकरणी जव्हार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास चालू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अप्पासाहेब लेंगरे यांनी दिली.

हेही वाचा - सामूहिक आत्महत्येचा नवा खुलासा, मुलीची हत्या करत आईची आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.