सांगली - कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना मिरज शहरात घडली आहे. पूजा माने असे मृत महिलेचे नाव असून खुनाच्या घटनेनंतर पती चेतन माने हा फरार झाला आहे.
किरकोळ वादातून खून -
पती पत्नीच्या किरकोळ वादातून पतीने पत्नीचा चाकूने भोकसून खून केल्याची घटना मिरज येथे घडली आहे. मिरजेतील टाकळी रोडवरील शिवम पार्क या ठिकाणी हा प्रकार समोर आला आहे. पूजा माने असे मृत महिलेचे नाव आहे. पती चेतन माने याने हा खून केल्याचे समोर आले आहे.
खूनाच्या घटनेनंतर पती फरार -
चेतन याचा टेलरिंग व्यवसाय आहे. पूजा ही गृहिणी आपल्या पती, तीन मुले आणि सासूसासऱ्या सोबत शिवम पार्क येथे राहायला होती. भंगार व्यवसाय करून सासू-सासरे कुटूंब चालवत आहेत. रविवारी सासूसासरे दोघे लग्न कार्याला बाहेर गेले होते. दरम्यान घरी असणाऱ्या पूजा आणि चेतनमध्ये वाद झाला. यावेळी चेतन याने पत्नी पूजा हिला घरात असणाऱ्या चाकूने भोसकले. तसेच पत्नी पूजा हिच्या शरीरावर चार वारही केले. यात गंभीर जखमी झाल्या. हे पाहून घरातील मुले ही आरडाओरड करू लागले. आरडाओरड झाल्याने शेजारी घरी आले. दरंम्यान खुनाच्या घटनेनंतर पती चेतन माने हा फरार झाला आहे. यावेळी त्या गंभीर अवस्थेत पडलेले पाहून शेजाऱ्यांनी पुजा माने यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. पण अति रक्तस्त्रावामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मिरज शहर परिसरात खळबळ उडाली आहे. याघटनेची मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.