ETV Bharat / state

जुळ्या बाहिणींना दहावीच्या परीक्षेत मिळाले सारखेच गुण

author img

By

Published : Aug 5, 2020, 10:13 AM IST

जुळी भावंडे दिसायला एकसारखी असतात हे एक कमालीचं वैशिष्ट असून त्यांचे स्वभाव, सवयी देखील सारख्याच असतात हा मात्र नेहमीच कुतूहलाचा प्रश्न राहिलेला आहे.

SSC examination
जुळ्या बाहिणींना दहावीच्या परीक्षेत मिळाले सारखेच गुण

पालघर - जुळी भावंडे दिसायला एकसारखी असतात हे एक कमालीचं वैशिष्ट असून त्यांचे स्वभाव, सवयी देखील सारख्याच असतात हा मात्र नेहमीच कुतूहलाचा प्रश्न राहिलेला आहे. पालघर जिल्ह्यात दोन जुळ्या बहिणींना दहावीच्या परीक्षेत देखील एकसारखेच गुण मिळवले आहेत. जुळ्या बहिणींच्या या कमालीच्या कामगिरीची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.

निकिता आणि अंकिता चिंतामण डगला या जुळ्या बहिणी आपल्या आई- वडिलांसोबत पालघर तालुक्यातील वसरे, भोईरपाडा येथे राहतात. शेतकरी कुटुंबातील या बहिणी अभ्यास देखील एकत्र करायच्या. दोघींनी दहावीची परीक्षा देखील एकत्र दिली.

निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता १० वीच्या परीक्षेत अनुक्रमे ४२५ व ४२३ गुण प्राप्त झाले. मात्र 'बेस्ट ऑफ फाइव्ह' या निकषांमध्ये दोघींना ५०० पैकी ३६४ गुण (७२.८० टक्के) असे समान गुण मिळाले आहेत. बोर्डाच्या परीक्षेत निकिता व अंकिता दोघी बहिणींना समान गुण मिळाल्याने नातेवाईकांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे.

बारावीपर्यंत सफाळे येथे शिक्षण घेऊन ते नंतर नर्सिंग अभ्यासक्रम शिकण्याचा त्यांचा मानस आहे. जुळ्या बहिणींना समान गुण मिळाल्याने त्यांच्या कुटुंबियांना देखील आनंद झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.