वसई (पालघर) वसईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वसईत शुक्रवारी तब्बल 358 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून, 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 118 कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे.
आज 358 रुग्ण आढळल्याने शहरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३३ हजार ८५४ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 918 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 118 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे कोरोनामुक्तांची एकूण संख्या ३० हजार ५३५ वर गेली आहे. सध्या शहरामध्ये २ हजार ४०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - हल्ला मोहल्ला प्रकरण : पोलिसांनी निर्दोष तरुणांना त्रास देऊ नये, शिख समाजातील महिलांची मागणी