ETV Bharat / state

वसई चिंचोटी फाटा येथे एसटी बसला अपघात, १२ प्रवासी जखमी - vasai st bus accident

वसईतील चिंचोटी फाटा येथे एसटी बसला अपघात झाला असून 12 प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेमध्ये एका महिला प्रवाशासह चालक व वाहकाची प्रकृती गंभीर असून त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुण्यावरून स्वारगेट ठाणे- वसई एसटी बसने समोरून चालणाऱ्या एका ऑईल टँकरला जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला.

वसई चिंचोटी फाटा येथे एसटी बसला अपघात, १२ प्रवाशी जखमी

author img

By

Published : Feb 23, 2020, 10:49 PM IST

पालघर - वसई चिंचोटी फाटा येथे रविवारी सकाळी एसटी बसला भीषण अपघात झाला असून यात १२ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यातील २ प्रवासी, वाहक व चालक गंभीर असल्याचे एसटी महामंडळाचे वाहतूक निरीक्षक संजीव डिसोजा यांनी सांगितले. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुण्यावरून स्वारगेट ठाणे-वसई एसटी बसने समोरून चालणाऱ्या ऑईल टँकरला जोराची धडक दिली. यामध्ये १२ जण जखमी झाले असून एका महिला प्रवासीसह चालक व वाहकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे एसटी कंट्रोल अधिकारी आनंद गोसावी यांनी सांगितले. रविवारी सकाळी ८ वाजता स्वारगेट-ठाणे-वसई ही एसटी बस (एम एच १४ बीटी ४९१६) प्रवाशांना घेवून वसईच्या दिशेने निघाली होती. दरम्यान, दुपारी १.१५ ला ही बस मधल्या लेनने आली असता अचानक ऑईल टँकरचा लोड असल्याने त्याचा वेग कमी झाला आणि बसीने त्याला पाठीमागून जोराची धडक दिली. यामुळे ऑईल टँकरमधील ऑईल रस्त्यावर पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती.

हेही वाचा - पालघरमध्ये संत सेवालाल महाराजांची जयंती साजरी, चौकाला दिले माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईकांचे नाव

या अपघातात बसमधील प्रवासी संगीता पठारे(५०) यांच्या डोक्याला जबर मार बसला तर, एसटी चालक नंदकुमार सापते, वाहक सतीश मुरकुटे, मारुती पठारे (५५) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर प्लॅटिनम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच, सागर पठारे (२४), भावेश पठारे व इतर प्रवासी जखमी असून त्यांची माहिती मिळू शकली नाही. एसटी महामंडळाचे वाहतूक निरीक्षक संजीव डिसोजा यांनी हा अपघात ऑईल टँकरचा वेग अचानक कमी झाल्याने झाला असल्याचे चालकाने सांगितल्याची माहिती दिली. डिसोजा यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेवून 'एसटी'च्या नियमानुसार गंभीर जखमींना १००० रुपयांची आर्थिक तात्काळी मदत व पी फॉर्म दिला. अजून जे प्रवाशी जखमी झाले आहेत त्यांनासुद्धा मदत देण्यात येणार असल्याचे डिसोजा यांनी सांगितले.

हेही वाचा - मच्छीमारांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करणार - असलम शेख

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.