पालघर - विरार पूर्व खार्डी रेती बंदरावर सुरू असलेल्या अवैध रेती वाहतूक सुरू आहे. या ठिकाणी कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस अधीक्षकांवर रेतीमाफियांनी हल्ला केल्याची घटना घडली.
खार्डी रेती बंदरावरील अवैध रेती उत्खननाची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना मिळाली. विरार पोलिसांना याबाबतची कोणतीही कल्पना न देता सिंग यांनी आपल्या अंगरक्ष व चालकासह रात्रीच्या सुमारास खार्डी रेती बंदरावर धाड टाकली. अचानक पडलेल्या धाडीमुळे रेती माफियांची चांगलीच धावपळ उडाली. अधीक्षकांच्या अंगरक्षकाने रेतीने भरलेला ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ट्रक चालकाने अधीक्षकांच्या गाडीवर ट्रक घालण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा - मार्निंग वॉकला गेलेल्या १७ वर्षीय तरुणीचे अपहरण करून पाच जणांचा सामूहिक बलात्कार
याप्रकरणी तीन जणांवर कारवाई करण्यात आली आहे. मागील दोन महिन्यांपासून खाणीवडे व खार्डी रेती बंदरावर रेती चोरीचा प्रकार बिनधास्तपणे सुरू होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही बंदरावरील रेती माफियांचे विरार पोलिसांशी लागेबांधे आहेत. त्यामुळेच पालघर पोलीस अधीक्षकांनी याबाबतची कोणतीही पूर्व कल्पना विरार पोलिसांना न देता ही धाडसी कारवाई केली. त्यानंतर विरार पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
हेही वाचा - धक्कादायक...! भिवंडीत दोन शाळकरी मुलींवर बलात्कार
अधीक्षकांनी केलेल्या कारवाईत ट्रक चालक निरजलाल यादव, सुनील इंद्रजित चव्हाण, अनिल तुकाराम चव्हाण या तिघांना अटक करण्यात आली. रेती उत्खनन करणारे ३ डंपर व १५ जेसीबी जप्त करण्यात आले आहेत.