पालघर - पावसाचा जोर आता कमी झाला असला, तरी वसईतील अनेक भागात अजूनही साचलेले पाणी कमी झालेले नाही. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वसई वसंत नगरी ते एव्हरशाईन सिटी, वसई पंचवटी ते मुंबई अहमदाबाद महामार्गाकडे जाणारा रस्ता खचला आहे. या रस्त्यावर भला मोठा खड्डा पडला आहे.
या खड्ड्याच्या ठिकाणी गटाराचे झाकण आहे. वसई-विरार महापालिकेचे सफाई कर्मचारी, वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या या रस्त्यावर दुरुस्तीचे काम सुरू आहे. या मार्गावरची वाहतूक इतरत्र वळवण्यात आली आहे.