ETV Bharat / state

पालघरमध्ये ५ वर्षांपासून गटारीची समस्या तशीच, अनेक तक्रारीनंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष - Since last 5 years in palghar

कुडूस ही ग्रामपंचायत अर्थिकदृष्ट्या सक्षम मानली जाते. या ग्रामपंचायतीच्या हद्दीत औद्योगिक कारखान्याचे जाळे आहे. तसेच सिमेंट काँक्रीटचे जंगलही येथे झपाट्याने वाढले आहे. तर येथील नाना अपार्टमेंट जवळच्या गटारीचे पाणी तुंबले आहे.

गटारीच्या पाण्याच्या निचरा न झाल्यामुळे पाणी रस्त्यावर आले आहे.problem with the mortgage remains the same
author img

By

Published : Sep 8, 2019, 6:00 PM IST

Updated : Sep 8, 2019, 6:30 PM IST

पालघर - वाडा तालुक्यातील कुडूस ग्रामपंचायत हद्दीतील नाना अपार्टमेंटजवळ गटाराचे पाणी तुंबल्याने येथील नागरिकांना मोठ्या दुर्गंधीचा सामना करण्याबरोबरच गटाराच्या पाण्यातून प्रवास करावा लागतो. या समस्येप्रकरणी स्थानिक रहिवाशांनी ग्रामपंचायत आणि वाडा तहसीलदार कार्यालयाला निवेदन दिले होते. मात्र ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही स्थानिक रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे गेली चार ते पाच वर्षात न सुटलेली समस्या केव्हा सुटेल? असा प्रश्न रहिवासी उपस्थित करत आहेत.

पालघरमध्ये ५ वर्षांपासून गटारीची समस्या तशीच, अनेक तक्रारीनंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष

हेही वाचा - दिल्लीतील गांधी आश्रम आजही केंद्र सरकारकडून मदतीच्या प्रतिक्षेत...

वाडा तालुक्यातील कुडूस ही ग्रामपंचायत अर्थिकदृष्ट्या सक्षम मानली जाते. या ग्रामपंचायतीच्या हद्दीत औद्योगिक कारखान्याचे जाळे आहे. तसेच सिमेंट काँक्रीटचे जंगलही येथे झपाट्याने वाढले आहे. तर येथील नाना अपार्टमेंट जवळच्या गटारीचे पाणी तुंबले आहे. यामुळे येथील रहिवासी आणि व्यावसायिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. गटारीतून पाण्याचा निचरा होत नसल्याने गुडघाभर गटाराच्या पाण्यातून नागरिकांना येथून जावे लागते. पावसाळ्यात ही समस्या कायम राहते. गेल्या चार ते पाच वर्षांपासून ही समस्या कायम आहे.

हेही वाचा - 'राजा हिंदुस्तानी' फेम कथ्थक गुरु वीरु कृष्णनन यांचे निधन

या अपार्टमेंट जवळून भिवंडी-वाडा महामार्ग गेला आहे. पाणीच्या निचऱ्याबाबत ग्रामपंचायतीकडे नागरिकांनी अनेकदा तक्रार केली. मात्र, त्यांनी या समस्येवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बोट दाखवले. तर आता इतके दिवस होऊनही तोडगा न निघाल्यामुळे या समस्येवर तोडगा कधी निघणार हा प्रश्न येथील रहिवाशांना सतावत आहे.

हेही वाचा - पुढच्या वर्षी लवकर या..! मुंबईत ४४ हजार गौरी-गणपतीचे विसर्जन

प्रतिक्रिया -

माझे येथे मेडिकलचे दुकान आहे. येथे कायम गटारातून पाण्याचा निचरा होत नसल्याने येथे पाऊस थांबला तरी पाणी साचत असते. हे पाणी माझ्या दुकानाच्या पायरी पर्यंत तर कधी दुकानात शिरते. त्यामुळे दुकानातली महागडी औषधे खराब होतात. ग्राहक सुद्धा पाण्यातून येत नाहीत. त्यामुळे आमच्या धंद्यावर परिणाम होतो. ही समस्या तत्काळ सोडवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
- मुकेश शर्मा (मेडिकल दुकानधारक, कुडूस)

Intro:गटाराची पाणी निच-याची समस्या सुटेल केव्हा?
तक्रारी करूनही समस्या कायम,
दुर्गंधीचा वास आणि गटारीचे पाण्यातून मार्ग

पालघर (वाडा) - संतोष पाटील
पालघर जिल्ह्य़ातील वाडा तालुक्यातील कुडूस ग्रामपंचायती हद्दीतील नाना अपार्टमेंटजवळ गटाराचे पाणी तुंबल्याने इथल्या नागरिकांना मोठ्या दुर्गंधीचा सामना आणि गटाराच्या पाण्यातून जावे लागत आहे . या समस्येबाबत ग्रामपंचायत व वाडा तहसीलदार कार्यालयाला निवेदनाद्वारे ही समस्या सोडविण्याची मागणी केली.ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागही या समस्येचे गाऱ्हाणे मांडून या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप इथल्या रहिवासीकडून केला जातोय.त्यामुळे गेली चार पाच वर्षात न सुटलेली समस्या केव्हा सुटेल? असा प्रश्न इथल्या रहिवाशींना सतावत आहे.वारंवार याच समस्येची तक्रार घेऊन संबंधित प्रशानाकडे आणि ती समस्या तडीस जात नाही.
वाडा तालुक्यातील कुडूस ही ग्रामपंचायत अर्थिकदृष्ट्या सक्षम असलेली ग्रामपंचायत मानली.या ग्रामपंचायतीच्या हद्दीत औद्योगिक कारखान्याचे जाळे आहे.तसेच इमारती सिमेंट काॅक्रीटचे जंगलही येथे झपाटय़ाने वाढले आहे.
येथील नाना अपार्टमेंट जवळच्या गटारीचे पाणी तुंबून इथल्या रहिवाशी आणि व्यावसायिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो.पावसाळ्यात तर ही समस्या कायम राहते. तेथे गटारीतून पाण्याचा निचरा होत नसल्याने गुडघाभर गटाराच्या पाण्यातून नागरिकांना येथून जावे लागते.ही समस्या चार-पाच वर्षापासुन येथे जैसे थे आहे.या अपार्टमेंट जवळून भिवंडी -वाडा महामार्ग गेला आहे.पाणी निच-याबाबत ग्रामपंचायतीकडे याबाबत नागरीक तक्रार करतात पण ते या समस्येवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बोट दाखवते.तर नागरीक गटारीचे पाणी जायला मार्ग करा अशी मागणी करते.अशा प्रकारात माञ इथल्या या समस्येवर तोडगा कधी निघेल? हा प्रश्न इथल्या रहिवासींना सतावतोय.

प्रतिक्रिया
माझे येथे मेडिकलचे दुकान आहे. येथे कायम गटारातून पाण्याचा निचरा होत नसल्याने येथे पाऊस थांबला तरी पाणी साचत असते.हे पाणी माझ्या दुकानाच्या पायरी पर्यंत तर कधी दुकानात शिरते.त्यामुळे दुकानातली महागडी औषधे खराब होतात.ग्राहक सुद्धा पाण्यातून येत नाहीत नाही त्यामुळे आमच्या धंद्यावर परिणाम होतो.ही समस्या सोडवावी अशी मागणी आहे.

मुकेश शर्मा
मेडिकल दुकानधारक
कुडूस
Body:मुकेश शर्मा
मेडिकल स्टोर
कुडूसConclusion:2 videos
Last Updated : Sep 8, 2019, 6:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.