ETV Bharat / state

Palgharhealth issues : पालघरमध्ये आरोग्य सुविधा नसल्याने गर्भवतीसह बालकाचा मृत्यू; झेडपी अध्यक्षांकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी - पालघर डहाणू आरोग्य विभाग

पालघर डहाणू आरोग्य विभागाच्या असुविधेमुळे गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यातील कासा येथे घडली आहे. कासा उपजिल्हा रुग्णालयात सोनाली वाघात या गरोदर मातेला आरोग्य सुविधा मिळाल्या नाहीत. म्हणून तिला धुंदलवाडी वेदांता रुग्णालयात प्रसूतीसाठी नेत असताना अर्ध्या रस्त्यातच रुग्णवाहिकेत तिने आपला प्राण सोडला.

Pregnant Mother And Baby Death
गर्भवतीसह बालकाचा मृत्यू
author img

By

Published : May 17, 2023, 8:32 AM IST

Updated : May 17, 2023, 9:52 AM IST

पालघरमधील आरोग्य सुविधांची समस्या जटील

पालघर : पालघर डहाणू आरोग्य विभागाच्या सुविधांच्या अभावामुळे तेथे नेहमीच नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागतो. अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये आईने आपल्या बाळासह जीव गमवला आहे. डहाणूतील ओसरविरा येथील सोनाली वाघात या २१ वर्षीय गरोदर मातेला प्रसुतीसाठी २७ मे ही तारीख देण्यात आली होती. मात्र आज अचानक तिला प्रसवकळा होऊ लागल्या. तिच्या नातेवाईकांनी तिला कासा उपजिल्हा रुग्णालयात आणले. रुग्णालयात तिला एका नर्सकडून गोळी देण्यात आली. त्यानंतर बऱ्याच वेळ तिच्याकडे दुर्लक्ष केले गेले. कुटुंबियांनी कासा रुग्णालयातील डॉक्टरांची भेट घेतली. डॉक्टरांनी तिला डहाणूतील धुंदलवाडी वेदांता रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.

प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे जीव गेला : तिला धुंदलवाडी रुग्णालयात रुग्णवाहिकेने नेत असताना तिथे पोहोचण्याआधीच तिचा मृत्यू झाला, असे वेदांत रुग्णालयातील डॉक्टरांकडून सांगितले गेले. कासा उपजिल्हा रुग्णालयातील प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे माता व बाळ या दोघांचा जीव गेल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. या घटनेनंतर मयत गर्भवती मातेच्या कुटुंबीयांनी रुग्णालय परिसरात टाहो फोडला असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे.

ही घटना जर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाली असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हावी. - प्रकाश निकम, जिल्हा परिषद अध्यक्ष पालघर

आरोग्य व्यवस्था जबाबदार : दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे सत्र पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सुरू होते. त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी या घटनेविषयी पालकमंत्र्यांना माहिती दिली. उपजिल्हा रुग्णालय असताना आरोग्य व्यवस्थेची वाताहत असल्याची कल्पनाही दिली. त्या ठिकाणी आयसीयू युनिट असते, तर त्या मातेचा व गर्भाशयातील बाळाचा मृत्यू झाला नसता. त्याला आरोग्य व्यवस्था जबाबदार असल्याचा ठपका त्यांनी ठेवला.

बिनकामाच्या वस्तू खरेदी केल्या : यावर खासदार राजेंद्र गावित यांनी त्या रुग्णालयात त्यांचा स्वतःचा अनुभव कथन केला. त्यांची प्रकृती ठीक नसताना ते तिथे गेले होते, त्यावेळी तिथे साधी इसीजी मशीन, ग्लुकोरेटर ही उपलब्ध नव्हते. आरोग्य विभागाने या मशीनरी घेणे अपेक्षित असताना त्यांनी टीव्ही खरेदी केले. वॉटर कुलर खरेदी केली, रुग्णांना उपयुक्त ठरतील अशा वस्तू खरेदी करणे अपेक्षित असताना बिनकामाच्या वस्तू खरेदी केल्याचा आरोप त्यांनी केला.

मृत्यूबाबत संशयाला वाव : जिल्हा शल्य चिकित्सकांची या मृत्यूबाबतची उत्तरे दरवेळी बदलत असतील, तर ते कासा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी उत्तरात बदल करत आहेत का? मृतांच्या नातेवाईकांनी तिच्या मृत्यूबाबत डॉक्टरांचा हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचे सांगून डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली आहे. एकंदरीत आपल्या सहकाऱ्यांच्या बचावासाठी जिल्हा शल्य चिकित्सक उत्तरे बदलत असल्याने तिच्या मृत्यूबाबत संशयाला वाव मिळत आहे.

डॉक्टरांवर कारवाईची मागणी : माझ्या सुनेला दाखल केल्यानंतर डॉक्टरांना भेटल्यावर सेलवासला घेऊन जा किंवा धुंदलवाडी येथील वेदांता हॉस्पिटलमध्ये न्या. असे डॉक्टर बोलत होते. इथे कुठल्याही प्रकारची सुविधा नसल्याने तिच्यावर उपचार होणे अपेक्षित असताना त्यांनी केले नाहीत. माझ्या सुनेच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी मयत मुलीचे सासरे शिवराम वाघात यांनी केली आहे.

हेही वाचा :

  1. Fatehpur Road Accident : टँकरच्या धडकेत 9 जणांचा जागीच मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर
  2. Thane Crime : 'संडे, मंडे'चे 'स्पेलिंग' येत नाही, म्हणून सहा वर्षीय विद्यार्थ्यास शिक्षिकेकडून अमानूष मारहाण
  3. Challenge To Surrogacy Rule Amendment: केंद्राच्या सरोगसीबाबत नियमातील दुरुस्तीला मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान

Last Updated : May 17, 2023, 9:52 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.