पालघर - शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासूनच सरकारचा गोंधळात गोंधळ सुरू आहे. विभिन्न विचारधारेचे पक्ष एकत्र काम करू शकत नाहीत हे स्पष्ट आहे, अशी सरकारवर टीका विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
हेही वाचा - 'आता ‘मातोश्री’ वरुन आदेश येत नाही, तर दिल्लीतील मातोश्रींचे आदेश ऐकावे लागतात'
पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने दांडू तालुक्यातील कासा येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा - 'विश्वासघाताने तयार झालेल्या सरकारने शेतकऱ्यांचाही घात केला'
यावेळी ते म्हणाले, उद्धव ठाकरे सांगतात की, राज्यातील जनतेला आनंद व सुख समाधान द्यायचे आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला त्यांच्या पक्षाचे आमदार आणि शिवसैनिकही आनंदी नाहीत. या सरकारमध्ये सामील असलेल्या पक्षांचे कार्यकर्तेच आनंदात नसतील, तर जनता आनंदात कशी राहू शकते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हे सरकार फार काळ टिकू शकणार नाही, अशी टीकाही दरेकर यांनी केली.