ETV Bharat / state

नालासोपाऱ्यात 15 मिनिटांत ई-पास देण्यासाठी 1500 रुपये घेणाऱ्या दोघांना अटक - E pass racket exposed by police

ई-पास काढण्यासाठी 15 दिवस ते महिना लागतो. मात्र, हे महाशय केवळ 15 मिनिटात ई-पास मिळवून देत होते आणि त्यासाठी 1500 रुपये घेत होते.पोलिसांनी आता या ब्रिजेश दुबे आणि अतिश गडा दोघांच्या मुसक्या आवळल्यात. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

Nalasopara latest news
नालासोपारा लेटेस्ट न्यूज
author img

By

Published : Jul 25, 2020, 3:04 PM IST

नालासोपारा(पालघर) - ई-पासचा घोटाळा करणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. गेल्या अनेक महिन्यांपासून हे दोघे बिनदिक्कतपणे ई-पासचा काळाबाजार करत होते. झेरॉक्सच्या दुकानात कसलीही भीती न बाळगता त्यांचा व्यवसाय सुरु होता.ऐरवी ई-पास काढण्यासाठी 15 दिवस ते महिना लागतो. मात्र, हे महाशय केवळ 15 मिनिटात ई-पास मिळवून देत होते आणि त्यासाठी 1500 रुपये घेत होते.

1500 रुपयात कुणालाही 15 मिनिटात ते पास मिळवून देत होते. पोलिसांनी आता या ब्रिजेश दुबे आणि अतिश गडा दोघांच्या मुसक्या आवळल्यात. हे दोघे किती दिवसापासून ई- पास काढून देत होते आणि त्यांनी कुणाकुणाला पास दिलाय याचा तपास पोलीस करत असून तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने व दत्तात्रय पाटील यांनी लोकांना आवाहन केले आहे की असे पाससाठी कोणाकडून पैसे उकळले गेले असतील तर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करावी.

जेव्हा रामदेव झेरॉक्स सेंटरच्या लोकांशी विचारणा केली असता त्यांनी एक धक्कादायक उत्तर दिले की हे पास देण्यासाठी कोणी त्यांच्याकडे पास घ्या म्हणून सांगायला गेले नव्हते त्यांना गरज होती म्हणून आले.

धक्कादायक म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशिवाय पास मिळणं शक्य नाही. त्यामुळं या दोघांना जिल्हाधिकारी कार्यालयातील कोण कोण मदत करत होते. याचा तपास पोलिसांकडून होणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील मोठे मासे गळाला लागणार का? हेच आता पाहावे लागणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.