ठाणे - भिवंडी शहरातील अंजुरफाटा रेल्वे स्टेशन परिसरातील निर्जनस्थळी असलेल्या झाडाझुडपात एका २५ वर्षीय विवाहितेवर दिरासह ४ नराधमांनी पाशवी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेच्या तक्रारीवरुन नारपोली पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करत पीडितेच्या नराधम दिरासह 3 नराधमांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
हेही वाचा - गुंगीचे औषध देवून अल्पवयीन मुलीवर 3 वर्षे वारंवार बलात्कार; आरोपींमध्ये पीडितेच्या आईचाही समावेश
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरातील अंजुरफाटा लगतच्या साई प्रसन्ना सोसायटी परिसरात विवाहिता कुटुंबासह राहते. तिच्या लहान दिराने तिला फसवून अंजुरफाटा रेल्वे स्टेशन लगतच्या निर्जनस्थळी झाडाझुडपात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास आणले. यावेळी त्याने पीडितेवर बळजबरीने बलात्कार प्रयत्न केला. त्यामुळे पीडितीने प्रतिकार करुन आरडाओरडा केला. ही घटना घडत असताना घटनास्थळाच्या काही अंतरावर वावटे पाडा येथे राहणारे 4 नराधम नशा करत बसले होते. त्यांनी पीडितेचा आवाज ऐकून घटनास्थळी येऊन पीडितेची सोडवणूक करण्याचा बहाण्याने तिच्या दिराच्या तावडीतून सोडवनूक करत असल्याचे भासवत पीडितेसह दिराला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.
हेही वाचा - धक्कादायक..! १० वर्षीय चिमुरडीवर बापाचा बलात्कार, नराधम अटकेत
घटनेनंतर पीडितेने कशीबशी या नराधमांच्या तावडीतून सुटका करुन घेत थेट नारपोली पोलीस ठाणे गाठून आपल्यावर बेतलेला प्रसंगाची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ नराधम दिराला ताब्यात घेऊन घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच पीडितेने सांगितलेल्या वर्णनावरुन इतर नराधमाची चौकशी करुन या गुन्ह्यात सहभागी असलेला गोटीराम लबडे व अन्य दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना अटक केली.
दरम्यान, या चारही नराधमांना आज न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक रवींद्र वाणी करीत असून ४ नराधमांना पैकी २ जण अल्पवयीन असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.