पालघर - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पालघर जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर बंधनकारक तसेच कोरोनाविषयी नियम व अटींचे काटेकोर पालन करावे असे आवाहन केले आहे. कोरोना विषयीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
सार्वजनिक ठिकाणांची वेळोवेळी करण्यात येणार पाहणी
मंगल कार्यालय, कोचिंग क्लासेस, चित्रपटगृह, व्यायामशाळा, शॉपिंग मॉल, धार्मिक स्थळे उद्यान बाजारपेठा रेस्टॉरंट शाळा-महाविद्यालयात नाट्यगृह अशा ठिकाणांची वेळोवेळी पाहणी करण्यात येणार आहे.
कोरोना नियम व अटींचे पालन न केल्यास होणार कारवाई
कोरोनाविषयी नियम व अटींचे काटेकोर पालन नागरिकांनी करावे असे निर्देश पालघर जिल्हा प्रशासनाने दिले असून नियमांचे उल्लंघन झाल्यास किंवा मास्क न वापरल्यास २०० रुपये दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक तसेच मुख्याधिकारी यांच्यात समन्वयाने एकत्रितरीत्या ही कारवाई करण्याचे आदेश पालघर जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.