ETV Bharat / state

पालघर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात - palghar zilla parishad election voting start

राज्य सरकारच्या स्थापनेनंतर लागलेली ही पालघर जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे.

voting starts in palghar
पालघरमध्ये मतदानाला सुरुवात
author img

By

Published : Jan 7, 2020, 9:53 AM IST

Updated : Jan 7, 2020, 1:12 PM IST

पालघर - जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (मंगळवारी) मतदान होत आहे. या मतदानाला सकाळी साडेसात वाजता सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेच्या 57, तर 8 पंचायत समित्यांच्या 114 जागांसाठी हे मतदान होत आहे. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उद्या (बुधवारी) 8 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.

पालघर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक

राज्य सरकारच्या स्थापनेनंतर लागलेली ही पालघर जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदारांची संख्या एकूण 10 लाख 44 हजार 888 इतकी आहे. यात 5,30,621 पुरूष तर 5,14,228 महिला आणि 39 इतर यांचा समावेश आहे. यावेळी मतदानासाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी आणि इतर कर्मचारी मिळून एकूण 7221 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मतदानासाठी एकूण 2284 बॅलेट युनिट तर 1853 कंट्रोल युनिट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, तर शिवसेनेचे कडून कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे, जिल्हा संपर्कप्रमुख रविंद्र फाटक यांनी येथे हजेरी लावली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, काँग्रेस, बहुजन विकास आघाडी आणि काही जागांवर मनसे हे एकमेकांविरोधात लढत आहेत.

हेही वाचा - सत्तापिपासू भाजप आता रक्तपिपासू झालाय, बाळासाहेब थोरातांचा प्रहार

जिल्हा परिषदेसाठी निश्चित केलेल्या सदस्यांची संख्या 57 आहे. यात पंचायत समितीसाठी सदस्य संख्या 114 इतकी आहे. तर तालुकानिहाय संख्या अनुक्रमे तलासरी - 5 आणि 10, डहाणू - 13 आणि 26, विक्रमगड - 5 आणि 10, जव्हार - 4 आणि 8, मोखाडा - 3 आणि 6, वाडा - 6 आणि 12, पालघर - 17 आणि 34 तर वसई तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी सदस्य संख्या 4 तर पंचायत समितीसाठी सदस्यांची संख्या 8 इतकी आहे. तसेच वसई तालुक्यातही सकाळ पासून थंडीच्या वातावरणात ग्रामीण भागातील मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्याचे दिसून येत होते. वसईमध्ये 3 गटांसाठी आणि 7 गणांसाठी मतदान होत आहे. यात शिवसेना, भाजप आणि बहुजन विकास आघाडी पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यामुळे याठिकाणी तिहेरी लढत होणार आहे. तर या निवडणुकीत कोण बाजी मारते हे बुधवारी निकाल लागल्यावर स्पष्ट होणार आहे.

Intro:पालघर जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समित्यांच्या  सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवातBody:   पालघर जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समित्यांच्या  सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

नमित पाटील,
पालघर,दि.7/1/2020

       पालघर जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समित्यांच्या  सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होत असून मतदानाला सुरुवात झाली आहे. जिल्हा परीषदेच्या 57 तर 8 पंचायत समित्यांच्या 114 जागांसाठी मतदान होत आहे. राज्य सरकारच्या स्थापनेनंतर लागलेली पालघर जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे.                   

      जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदारांची संख्या 5,30,621 पुरूष, 5,14,228 महिला आणि 39 इतर अशी एकूण 10 लाख 44 हजार 888 इतकी आहे. मतदानासाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व इतर कर्मचारी अशा एकूण 7221 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  मतदानासाठी एकूण 2284 बॅलेट युनिट तर 1853 कंट्रोल युनिट उपलब्ध करून देण्यात आले आहेत.         

     पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसाठी निश्चित केलेल्या सदस्यांची संख्या 57 असून पंचायत समितीसाठी सदस्य संख्या 114 इतकी आहे. यामध्ये तालुकानिहाय संख्या अनुक्रमे पुढीलप्रमाणे : तलासरी- 5 आणि 10, डहाणू- 13 आणि 26, विक्रमगड- 5 आणि 10, जव्हार- 4 आणि 8, मोखाडा- 3 आणि 6, वाडा- 6 आणि 12, पालघर- 17 आणि 34 तर वसई तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी सदस्य संख्या 4 तर पंचायत समितीसाठी सदस्यांची संख्या 8 इतकी आहे.

Conclusion:
Last Updated : Jan 7, 2020, 1:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.