ETV Bharat / state

पोलीस कर्मचाऱ्यांना पाहिजे तिथे बदली..! पालघर पोलीस अधीक्षकांचा निर्णय - interest

आपल्या कुटुंबाला वेळ देता यावा, यासाठी पोलिसांची त्यांचा पसंतीच्या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी हा निर्णय घेतला आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांना पाहिजे तिथे बदली..! पालघर पोलीस अधीक्षकांचा निर्णय
author img

By

Published : Jun 12, 2019, 5:14 PM IST

पालघर - पोलिसांवरील ताणतणाव कमी व्हावा व त्यांना आपल्या कुटुंबाला वेळ देता यावा, यासाठी पोलिसांची त्यांचा पसंतीच्या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी हा निर्णय घेतला आहे.

दिवसरात्र आपले कर्तव्य बजवताना पोलिसांना अनेक सण-उत्सव, सुख-दु:खाच्या प्रसंगी त्यांच्या कुटुंबापासून दूर रहावे लागते. त्यामुळे ड्युटी सांभाळून आपल्या कुटुंबाला योग्य वेळ देता यावा यासाठी पालघरमधील पोलिसांची घराजवळील पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांना पाहिजे तिथे बदली..! पालघर पोलीस अधीक्षकांचा निर्णय

तब्बल 142 पोलिसांच्या बदल्या या त्यांच्या इच्छेनुसार करण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी जागा रिकाम्या नाही त्या ठिकाणी राहणाऱ्या पोलिसांना जवळच्या पोलीस ठाण्यात नियुक्त करण्यात आले आहे.

निवडणुका बंदोबस्त, मंत्री- नेते यांचे संरक्षण, सण-उत्सव, आंदोलने-मोर्चे आदी सह गुन्ह्यांचा तपास, गुन्हे रोखणे आदी मोठी जबाबदारी पोलिसांवर असते. अशावेळी आपले कर्तव्य बजावताना त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

त्यामुळे पोलिसांवरील ताण दूर व्हावा आणि त्यांना आपल्या कुटुंबीयांना वेळ देता यावा, यासाठी हा निर्णय घेतल्याचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी सांगितले आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील पोलिसांमध्ये समाधानचे वातावरण निर्माण झाले आहे.

Intro:पोलिसांवरील ताणतणाव कमी व्हावा व त्यांना आपल्या कुटुंबाला वेळ देता यावा यासाठी पोलिसांची त्यांचा पसंतीच्या ठिकाणी बदली: पालघर पोलीस अधीक्षकांचा निर्णय
Body:पोलिसांवरील ताणतणाव कमी व्हावा व त्यांना आपल्या कुटुंबाला वेळ देता यावा यासाठी पोलिसांची त्यांचा पसंतीच्या ठिकाणी बदली: पालघर पोलीस अधीक्षकांचा निर्णय

नमित पाटील,
पालघर, दि.12/6/2019

पोलीस दलातील दिवसरात्र आपले कर्तव्य बजवावे लागत असल्याने अनेक सण-उत्सव, सुख-दु:खाच्या प्रसंगी त्यांच्या कुटुंबापासून त्यांना दूर राहण्याची वेळ ओढवते. ड्युटी सांभाळून आपल्या कुटुंबाला योग्य वेळ देता यावा तसेच पोली म्हणून पालघर मधील पोलिसांना घराजवळील पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. 142 पोलिसांच्या बदल्या या त्यांच्या इच्छेनुसार करण्यात आल्या असून ज्या ठिकाणी जागा रिकाम्या नाही त्या ठिकाणी राहणाऱ्या पोलिसांना जवळच्या पोलीस ठाण्यात नियुक्त करण्यात असून त्यांच्या व्यथा कमी करण्याचा प्रयत्न पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी केला आहे.

जिल्हा निर्मिती नंतर पोलीस दलात असलेल्या अपुऱ्या मनुष्यबळाच्या साथीने कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम आजवर पोलिसांनी समाधानकारकरित्या केले आहे. पोलीस दलातील कर्मचारी हे अहोरात्र आपले कर्तव्य बजावत असतात, अशाा वेळी त्यांना आपल्या कुटुंबाला वेळ देता येत नाही. निवडणुका बंदोबस्त, मंत्री- नेते यांचे संरक्षण, सण-उत्सव, आंदोलने-मोर्चे आदी सह गुन्ह्यांचा तपास, गुन्हे रोखणे आदी मोठी जबाबदारी पोलिसांवर असते. अशावेळी आपले कर्तव्य बजावतांना त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

तपोलिसांवरील ताण- तणावापासून दूर व्हावा त्यांना आपल्या कुटुंबियाना वेळ देता यावा यासाठी पोलीस अधीक्षकांनी पोलिसांना पोलिस कर्मचाऱ्यांना त्यांच्या पसंतीप्रमाणे बदलीचे ठिकाण या नवीन पद्धतीचा अवलंब केला आहे. यामुळे निर्णयामुळे जिल्हयातील पोलिसांमध्ये समाधानचे वातावरण निर्माण झाले आहे.

बदली प्रक्रीया:-
तीन पसंतीक्रम घेऊन नालासोपारा, वालीव, विरार, अर्नाळा, पालघर, सातपाटी, डहाणू, घोलवड, मनोर, विक्रमगड, बोईसर, सफाळे आदी १७ पोलीस स्टेशन मधील १४२ बदलीपात्र कर्मचाऱ्यांपैकी ११७ कर्मचाऱ्यांची बदली त्यांच्या पसंतीप्रमाणे करण्यात आली आहे.

Byte

1. गौरव सिंग- पोलीस अधीक्षक, पालघर

2. श्रीकांत विक्रम तांदळे- पसंतीप्रमाणे बदली झालेले पोलीस कर्मचारी

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.