ETV Bharat / state

कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने नियंत्रण यंत्रणा कमी पडू नये - जिल्हाधिकारी - पालघर कोरोना बातम्या

कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींनी तातडीने मनुष्यबळ, साधनसामग्री, आयसीई उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

पालघर जिल्हाधिकारी
पालघर जिल्हाधिकारी
author img

By

Published : Jul 31, 2020, 9:30 PM IST

पालघर - जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींनी तातडीने मनुष्यबळ, साधनसामग्री, आयसीई उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना जिल्ह्यात आरोग्य विभागातील मनुष्यबळ, साधनसामग्री अपुरी पडत असल्याने हे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी दिले असून नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांना तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या मागणीप्रमाणे मनुष्यबळ, साधन सामग्री, अँटीजेन टेस्ट किट उपलब्ध करून देण्यात यावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील वाढत्या कोरोना रुग्णांचा सुरुवातीच्या टप्प्यातच शोध घेऊन उपचार करण्याकरीता फिवर क्लिनिक सुरू करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व त्यांना लागणारा तांत्रिक कर्मचारी वर्ग भरती करणे, याकरीता तालुका आरोग्य अधिकारी यांना आवश्यक असलेले मानधन नगरपरिषद व नगरपंचायतकडून वर्ग करण्यात यावे.

वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आवश्यकतेनुसार एका स्वतंत्र वाहनाची व्यवस्था नगरपरिषद व नगरपंचायतीने करून द्यावी. नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना अँटीजेन टेस्ट करण्याकरीता तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मागणीप्रमाणे अँटीजेन टेस्ट किट करीता आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा. नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीतील सर्व कुटुंबांचा सर्वे नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर करण्यात यावा. याकरीता आवश्यक ते मुनष्यबळ नगरपरिषद व नगरपंचायतीने उपलब्ध करून द्यावे व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने सर्वेक्षणाचे काम करावे. तसेच तालुका आरोग्य अधिकारी यांना मध्यवर्ती नियंत्रण कक्षाकरीता डाटा एंट्री ऑपरेटर उपलब्ध करून द्यावा. अशा प्रकारच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिल्या आहेत.

आरोग्य सेविका तसेच नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात सर्वेक्षण करणारे कर्मचारी यांना आवश्यकतेप्रमाणे थर्मल मशिन, पल्स ऑक्सीमीटर, मास्क, सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोज इ. साधनांचा पुरवठा करण्यात यावा. जनजागृतीकरीता बॅनर, पोस्टर, लाऊडस्पिकरद्वारे जाहीर आवाहन याप्रकारचे उपक्रम सतत राबविण्यात येणार आहे.

नगरपरिषद व नगरपंचायतीस या बाबींकरिता निधीची कमतरता असल्यास 14 व्या वित्त आयोग योजनेतून मंजूरीकरीता प्रस्ताव सादर करण्यात यावेत, अशा सूचना मुख्याधिकारी नगरपरिषद पालघर, मुख्याधिकारी डहाणू व जव्हार, नगरपंचायत तलासरी, विक्रमगड, मोखाडा, वाडा यांना जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.