ETV Bharat / state

इंजेक्शन देऊनच ठार मारणार; शरद पवारांना फेसबुकवरून धमकी - नालासोपारा

शरद पवार यांना महेश खोपकर या व्यक्तीने फेसबुक अकाउंटवरुन पोस्ट टाकत जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

तरुणाची फेसबुक पोस्ट
author img

By

Published : Apr 19, 2019, 5:09 PM IST

पालघर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना महेश खोपकर (रा. नालासोपारा) या व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. महेशने आपल्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट टाकत ही धमकी दिली असून पवारांना उद्देशून आक्षेपार्ह शब्दही वापरले आहेत.

महेशने १६ एप्रिलला दुपारी १२ वाजून ४ मिनिटांनी स्वत:च्या फेसबुक अकाउंटवर शरद पवार यांना धमकी देणारी पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये त्याने ‘इंजेक्शन देऊनच ठार मारणार’, असे लिहिले आहे. यामुळे महेशला फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या वसईच्या कार्यकर्त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात पोलिसांना निवेदनही देण्यात आले आहे.

Intro:' इंजेक्शन देऊनच ठार मारणार ’ नालासोपारा येथील महेश खोपकर नामक व्यक्तीने फेसबुक पोस्ट टाकत शरद पवारांना दिली धमकी
कारवाई करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणीBody:' इंजेक्शन देऊनच ठार मारणार ’ नालासोपारा येथील महेश खोपकर नामक व्यक्तीने फेसबुक पोस्ट टाकत शरद पवारांना दिली धमकी
कारवाई करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी

नमित पाटील,
पालघर, दि.19/4/2019

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना नालासोपारा येथील महेश खोपकर नामक व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. महेश खोपकर याने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून धमकी देणारी पोस्ट टाकली. त्याचप्रमाणे त्याने शरद पवार यांना उद्देशून आक्षेपार्ह शब्द वापरले आहेत. स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून याचा निषेध करण्यात आला असून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महेश खोपकर नामक व्यक्तीने १६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजून ४ मिनीटांनी स्वत:च्या फेसबुक अकाऊंटवर शरद पवार यांना धमकी देणारी पोस्ट टाकली आहे. यामध्ये त्याने ‘इंजेक्शन देऊनच ठार मारणार’ असे त्याने पोस्टमध्ये लिहीले आहे. तसेच शरद पवार यांना उद्देशून आक्षेपार्ह शब्दही वापरले.

महेश खोपकर याच्यावर शरद पवार यांना मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. वसईच्या कार्यकर्त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्याकडे मागणी केली आहे. तसे निवेदनही देण्यात आले आहे. तसेच महेश खोपकरवर तात्काळ कारवाई केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.