पालघर - दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पाठीमागून विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी केला आहे. पालघर येथे कृषी कायद्याबाबत भारतीय जनता पक्षाच्यावतीने आज (सोमवारी) पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हितासाठी -
केंद्र सरकारने पारित केलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यामुळे शेतकरी आपला शेतमाल कुठेही, कोणत्याही बाजारपेठेत विकू शकतो. या कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला संरक्षण मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - ..मग देशात घोषित आणीबाणी आहे का? मुख्यमंत्री ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार
शेतकऱ्यांची दिशाभूल -
कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. मात्र, त्याची खरी माहिती शेतकऱ्यांपर्यंत नसल्याने हे आंदोलन सुरू असल्याचे खासदार कपिल पाटील म्हणाले. कृषी मालाची दलाली करणाऱ्या आडत्यांना या कायद्यामुळे दलाली मिळणार नसल्याने त्यांनी शेतकऱ्यांमध्ये चुकीची भावना पसरवून त्यांना आंदोलन करायला लावल्याचा आरोपही पाटील यांनी यावेळी केला.