ETV Bharat / state

पालघरमध्ये पुन्हा उसळली परप्रांतीयांची गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा - Social distancing not followed in Palghar

रेल्वे स्थानकातून आज दिवसभरात तीन श्रमिक रेल्वे सोडण्यात येणार होत्या. मात्र काही करणास्तव दोन रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.

पालघरमध्ये पुन्हा उसळली परप्रांतियांची गर्दी

author img

By

Published : May 21, 2020, 1:13 PM IST

Updated : May 21, 2020, 1:30 PM IST

पालघर - परप्रांतीयांनी आपल्या राज्यात जाण्यासाठी पुन्हा आर्यन स्कूलच्या मैदानावर गर्दी केली आहे. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून आले आहे.

पालघर रेल्वे स्थानकातून आज प्रतापगड, जौनपूर वदोही या तीन ठिकाणी विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात येणार होत्या. मात्र काही कारणास्तव प्रतापगड व वदोही येथे जाणाऱ्या रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. आज फक्त उत्तरप्रदेशातील जौनपूरसाठी श्रमिक रेल्वे रवाना होणार आहे. त्यानुसार या सर्व नोंदणी केलेल्या कामगार, मजुरांना आज आर्यन हायस्कूल मैदानात येथे टोकन देण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर गावी परतणाऱ्या नागरिकांनी टोकन घेण्यासाठी मैदानावर मोठी गर्दी केली आहे.

पालघरमध्ये पुन्हा उसळली परप्रांतियांची गर्दी

रेल्वेच्या वेळेनुसार या सर्व नागरिकांना पोलीस व महसूल प्रशासनामार्फत रेल्वेस्थानकापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. त्यानंतर रेल्वे प्रशासनमार्फत या मजुरांना विशेष रेल्वेने रवाना करण्यात येणार आहे.

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

हेही वाचा-वाशिममध्ये नागरिकांची रस्त्यांवर गर्दी, 'फिजिकल डिस्टन्सिंग'चा फज्जा

दरम्यान, टाळेबंदीमुळे अनेक परप्रांतीय राज्यांच्या विविध भागात अडकले आहेत. त्यांच्या सोयीसाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने श्रमिक रेल्वे सुरू केल्या आहेत.

Last Updated : May 21, 2020, 1:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.