ETV Bharat / state

भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत शिवसेना खासदारांची उपस्थिती, पालघर जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण - डॉ. भारती पवार

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या नेतृत्वात भाजपची जन आशीर्वाद यात्रा सुरू करण्यात आली. दरम्यान, तलासरी येथे या यात्रेत शिवसेनेचे पालघरचे खासदार राजेंद्र गावित दिसल्याने जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची जन आशीर्वाद यात्रा

author img

By

Published : Aug 16, 2021, 8:30 PM IST

पालघर - जिल्ह्यात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या नेतृत्वात भाजपची जन आशीर्वाद यात्रा सुरू करण्यात आली. दरम्यान, तलासरी येथे या यात्रेत शिवसेनेचे पालघरचे खासदार राजेंद्र गावित दिसल्याने जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची पालघर जिल्ह्यात जन आशीर्वाद यात्रा

आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची जन आशीर्वाद यात्रा

भाजपच्या नवीन केंद्रीय मंत्र्यांच्या नेतृत्वात राज्यात विविध ठिकाणी सध्या जन आशीर्वाद यात्रा सुरू करण्यात आली आहे. पालघरमध्ये आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी जन आशीर्वाद यात्रा सुरू केली. पालघर शहरातील हुतात्मा चौकातून आज 16 ऑगस्ट रोजी सकाळी यात्रेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी पालघर, वाघोबा मंदिर, मानोर, चारोटी, महालक्ष्मी मंदिर, तलासरी, वनवासी कल्याण केंद्र हातणे, विक्रमगड, जव्हार, मोखाडा असा या जन आशीर्वाद यात्रेचा प्रवास झाला.

जिल्ह्यात उलटसुलट राजकीय चर्चांना उधाण

तलासरी येथे शिवसेना खासदारांची या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान उपस्थिती दिसल्याने, सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तलासरी येथील वनवासी कल्याण केंद्रात जन आशीर्वाद यात्रेनिमित्त सुरु असलेल्या कार्यक्रमादरम्यान शिवसेनेचे पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार, विधान परिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांची भेट घेतल्याने, जिल्ह्यात उलटसुलट राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.