ETV Bharat / state

पालघरमध्ये लॉकडाऊन काळात वाढले कुपोषण: गेल्या सहा महिन्यांत 100 पेक्षा जास्त अतितीव्र कुपोषित बालके

दरवर्षी पावसाळयादरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण भागात कुपोषणात वाढ होत असल्याचे आकडेवारीतून दिसते. गेल्यावर्षी मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्यात सर्वाधिक कुपोषित बालकांची नोंद जव्हार तालुक्यातील असून येथे 401अतितीव्र बालकांची नोंद झाली होती. विक्रमगडमध्ये 345 व डहाणूत 219 बालकांची नोंद होती. यंदा मार्च ते ऑगस्ट याच काळात जव्हार, डहाणूत कुपोषण वाढले असून जव्हार तालुक्यात 524 बालकांची तर डहाणूत 317 बालकांची नोंद झाली.

malnourished child increased in palghar district during the lockdown
पालघरमध्ये लॉकडाउन काळात पालघर जिल्ह्यात कुपोषण वाढले
author img

By

Published : Oct 13, 2020, 7:17 PM IST

पालघर - जिल्ह्यात मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्यात गेल्या वर्षी पेक्षा यंदा सुमारे 100 पेक्षा जास्त अतितीव्र (SAM) तर एक हजाराहून अधिक तीव्र कुपोषित बालके (MAM) वाढल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे देशभर लॉकडाउन जाहीर करण्यात आले, या काळात जिल्ह्यातील कुपोषणग्रस्त भागात अंगणवाड्या, ग्राम बाल विकास केंद्रे, आरोग्य व्यवस्था आदींवर प्रशासनाने भर न दिल्यामुळे पालघर जिल्ह्यात पुन्हा कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

पालघरमध्ये लॉकडाऊन काळात वाढले कुपोषण

पालघर जिल्ह्यात गेल्या वर्षी मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्यात 1376 अतितीव्र कुपोषित बालकांची नोंद आहे. तर 12684 तीव्र कुपोषित बालकांची नोंद झाली आहे. या उलट याच कालावधीत यंदा या आकडेवारीत वाढ झाल्याचे दिसून येते. या वर्षी 1493 अतितीव्र तर 14013 तीव्र कुपोषित बालकांची नोंद झाली. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी अतितीव्र कुपोषित बालकांमध्ये तब्बल 117 बालके तर तीव्र कुपोषित बालकांमध्ये 1329 एवढ्या संख्येने वाढ झाली आहे.

दरवर्षी पावसाळयादरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण भागात कुपोषणात वाढ होत असल्याचे आकडेवारीतून दिसते. गेल्यावर्षी मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्यात सर्वाधिक कुपोषित बालकांची नोंद जव्हार तालुक्यातील असून येथे 401अतितीव्र बालकांची नोंद झाली होती. विक्रमगडमध्ये 345 व डहाणूत 219 बालकांची नोंद होती. यंदा मार्च ते ऑगस्ट याच काळात जव्हार, डहाणूत कुपोषण वाढले असून जव्हार तालुक्यात 524 बालकांची तर डहाणूत 317 बालकांची नोंद झाली. विक्रमगडमध्ये 244 बालके अतितीव्र असल्याची नोंद झाली. तलासरी व पालघर तालुक्यात कुपोषण अल्प आहे. गेल्या वर्षी पेक्षा यंदा जव्हारमध्ये 123 कुपोषित बालके वाढली असून डहाणूत 102 बालके वाढल्याची नोंद झाली. वाढत असलेली ही कुपोषित बालके चिंतेचा विषय आहे. तर विक्रमगड तालुक्यात गेल्या वर्षीच्या संख्येपेक्षा 101 बालके कमी झाल्याची नोंद आहे.

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात असलेल्या वावर वांगणी गावात कुपोषणाने एकेकाळी शेकडो बालमृत्यू झाले होते. त्यावेळी तत्कालीन ठाणे व आताचा पालघर जिल्हा कुपोषणासाठी महाराष्ट्रात कुप्रसिद्ध झाला होता. त्यानंतर शासन प्रशासन कामाला लागले. बालमृत्यू रोखण्यात प्रशासनाला यश येत असले तरी कुपोषित बालकांची संख्या मात्र वाढत आहे. एकीकडे करोना व दुसरीकडे कुपोषित बालकांची संख्या वाढत असताना प्रशासनासमोर मोठे आव्हान असून जिल्ह्यात
कुपोषण निर्मूलनासाठी आणखी ठोस उपाययोजनांची गरज आहे.

अतितीव्र (SAM) व तीव्र (MAM) कुपोषित बालकांच्या आकडेवारी

मार्च ते ऑगस्ट (6 महिने) अतितीव्र कुपोषित बालके (SAM)
तालुके 2019 2020

डहाणू 319 317
तलासरी 17 8
मोखाडा 130 163
जव्हार 401 524
विक्रमगड 345 244
वाडा 178 152
पालघर 29 10
वसई 57 75
एकूण 1376 1493

मार्च ते ऑगस्ट (6 महिने) तीव्र कुपोषित बालके (MAM)
तालुके 2019 2020

डहाणू 1140 2336
तलासरी 1047 1096
मोखाडा 879 928
जव्हार 4132 4176
वि. गड 2565 2719
वाडा 2086 1834
पालघर 344 158
वसई 491 766
एकूण 12684 14013

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.