पालघर - विघ्नहर्ता म्हणजे विघ्न हरून आनंद देणारी बुद्धीची देवता असलेल्या गणपती मंगळवारी माघी चतूर्थीला प्रतिष्ठापना होणार आहे. तत्पूर्वी सोमवारी वसईत वाजतगाजत गणरायाचे आगमन झाले. दीड दिवसाच्या मुक्कामी राहिल्यावर बुधवारी भक्तीपूर्ण वातावरणात बाप्पाला मनोभावे निरोप देण्यात येणार आहे. वसईत तब्बल 3 हजार 142 घरगुती माघी गणपतींची प्रतिष्ठापना होणार आहे. त्याचप्रमाणे 43 सार्वजनिक गणपती बसविण्यात येणार आहेत.
माघी गणेशोत्सवानिमित्त वसईत सोमवारी गणरायांचे वाजतगाजत आगमन झाले. बाप्पा येणार म्हणून सगळीकडे उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण होते. मंगळवारी माघी चतुर्थीला बाप्पाची ठिकठिकाणी प्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. बाप्पाच्या सेवेत काहीही कमतरता नको, म्हणून गेल्या काही दिवसांपासून भक्त तयारीला लागले आहेत. अगदी घरगुती बाप्पाच्या सजावटीपासून ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सजावटीपर्यंत सगळीकडे भाविकांची लगबग सुरू आहे. वसईतील नाळा गावातील गणेशमूर्ती कारखान्यातून परिपूर्ण रंगकाम केलेल्या बाप्पाच्या मूर्ती उत्सवमंडपात नेण्यासाठी गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आले होते.
हेही वाचा - 'शिवभोजन'ला बोगस लाभार्थ्यांचं ग्रहण, ठेकेदाराचीचं माणसं घेत आहेत लाभ
२८ जानेवारीला बाप्पाच्या आगमनाने वसईत उत्साहाचे वातावरण आहे. गणेशोत्सव आणि बाप्पाचे आगमन सोहळा नेहमी अबालवृद्धांसाठी आनंद देणारा सोहळा आहे. विशेष म्हणजे, माघी गणेशाचे आगमन आणि प्राणप्रतिष्ठापना हा अंगारकी योग आला आहे.