ETV Bharat / state

Baby Died Due To Lack Of Roads : रस्त्याअभावी वेळेत उपचार न मिळाल्याने दोन महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू

author img

By

Published : Jul 12, 2023, 9:05 PM IST

Updated : Jul 13, 2023, 5:34 PM IST

पालघर जिल्ह्यात रस्त्याअभावी वेळेवर उपचार न मिळाल्याने दोन महिन्याच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बुधवारी पहाटे तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला.

Baby Died Due To Lack Of Roads
पालघर जिल्ह्यात वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू

पालघर : आदिवासीबहुल पालघर जिल्ह्यात एका चिमुकलीला वेळीच उपचार न मिळाल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील वाडा व विक्रमगड तालुक्याच्या हद्दीवर म्हसेपाडा नावाचे गाव आहे. हे गाव गारगाई व पिंजाल नदी बेटावर आहे. बुधवारी पहाटे येथील एका 42 दिवसाच्या मुलीची तब्बेत अचानक बिघडली. मात्र पावसामुळे गावात जायला रस्ता नसल्याने या मुलीला वेळेत उपचार मिळू शकले नाही, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी गावकरी आता प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत आहेत.

उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला : लावण्या नरेश चव्हाण (वय 42 दिवस) असे त्या दुर्दैवी मुलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाडा व विक्रमगड तालुक्याच्या हद्दीवरील म्हसेपाडा गावाची लोकसंख्या केवळ 150 ते 200 च्या आसपास आहे. वाडा येथे ग्रामीण रुग्णालय असून विक्रमगड तालुक्यातील मलवाडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. हे दोन्ही म्हसेपाड्यापासून काही किलोमीटर अंतरावर आहेत. मृतक लावण्याला मंगळवारी रात्री ताप आला होता. आधी तिच्या कुटुंबियांनी तिच्यावर घरगुती उपचार केले. मात्र त्यानंतर तिला श्वासोश्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यानंतर बुधवारी पहाटे तिला मलवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.

दवाखान्यात जाण्यासाठी काही किलोमीटर पायी चालावे लागते : या पाड्यावर जायला रस्ता नसल्याने बाजार, शाळा, कॉलेज तसेच दवाखान्यात जाण्यासाठी काही किलोमीटर अंतर पायी चालत जावे लागते. आता रस्त्याअभावी एका बालिकेचा मृत्यू झाल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या संदर्भात विक्रमगडचे तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. संदीप निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला असता हे बाळ न्युमोनियाने दगावले असल्याची माहिती त्यांनी दिली.

प्रशासनावर दिरंगाईचा आरोप : या प्रकरणी आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष अनंता वनगा यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 73 वर्ष झाली, मात्र आजही आदिवासी भागात रस्ते नाहीत, आरोग्याच्या सुविधा नाहीत. रस्ते नसल्याने रुग्णाला डोलीत वाहून न्यावे लागते. पावसाळ्यात सर्पदंशाने अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. हे प्रशासन व सरकारचे अपयश आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

हेही वाचा :

  1. Palghar News Today : लाखोंच्या 'खेळात' ५०० चिमुकल्यांचा जीव धोक्यात; अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ठेकेदाराकडून वर्ग खोल्यांचे काम अनधिकृत आणि निकृष्ट दर्जाचे

Last Updated : Jul 13, 2023, 5:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.