ETV Bharat / state

ZP School Bogus Construction : जिल्हा परिषद शाळेच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे; गावकऱ्यांनी केली पोलखोल

author img

By

Published : May 24, 2022, 3:01 PM IST

Updated : May 24, 2022, 3:45 PM IST

डहाणू तालुक्यातील चिंचणी पाटील पाडा ( Chinchani Patil Pada ) येथे सुरू असलेल्या जिल्हा परिषदेच्या ( inferior quality construction Zilla Parishad school ) शाळेच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे असून इमारतीचे पिलर हलतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.

ZP School Bogus Construction
ZP School Bogus Construction

पालघर - जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील चिंचणीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांची कामे निकृष्ट दर्जाची करण्यात आले असून ठेकेदार आणि बांधकाम विभाग विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करत असल्याचे चित्र समोर आले आहे. डहाणू तालुक्यातील चिंचणी पाटील पाडा ( Chinchani Patil Pada ) येथे सुरू असलेल्या जिल्हा परिषदेच्या ( inferior quality construction Zilla Parishad school ) शाळेच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे असून इमारतीचे पिलर हलतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.

शाळा दुरुस्तीच्या कामाचे पोलखोल करणारा व्हिडिओ

मागील दोन वर्षे कोरोनामुळे शाळा बंद अवस्थेत असल्याने अनेक शाळांची देखभाल दुरुस्ती अभावी दुरावस्था झाली आहे. अशातच चिंचणी येथील जि.प.शाळेचे दुरुस्तीचे बांधकाम ठेकेदाराकडून अतिशय निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचे ग्रामस्थांनी उघडकीस आणले आहे. बांधकामासाठी वापरण्यात येत असलेले रेती, सिमेंट सारखे साहित्य अतिशय अल्प दर्जाचे असून यामुळे जि.प. बांधकाम विभागाचे अभियंता आणि ठेकेदार हे शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याची उघड झाले आहे.

'ठेकेदाराला काळ्या यादीत टाका' : एकीकडे शासनाकडून जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारण्या करीता व जिल्हा परिषद शाळांमधील पट संख्या वाढावी,दर्जा सुधारावा यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र या सर्व बाबींचे कुठेही काटेकोर पालन होत नसून शासनाच्या निधीवर डल्ला मारण्याचे काम संबंधित अधिकारी यांना हाताशी धरून ठेकेदार करत आहेत. मात्र या सर्व बाबींची चौकशी होणे गरजेचे असताना ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे काम केले जात आहे. अशा ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान याच पिलरवर इमारत उभी राहिल्यास कधीही दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबींची सखोल चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, अशी मागणी आता जोर धरत आहे.

हेही वाचा - Sambhaji Raje Going Meets CM: 'आमचे पुढे काय करायचे ते ठरले'; संभाजीराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला रवाना

Last Updated : May 24, 2022, 3:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.