ETV Bharat / state

गडचिंचले हत्याकांड अफवेतूनच; 'राजकीय पक्षांनी जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला'

सीआयडीने याप्रकरणी 808 लोकांची सखोल चौकशी करून 154 जणांना अटक केली आहे. तसेच पुढील कारवाई न्यायालयात चालेल, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

home minister
अनिल देशमुख- गृहमंत्री
author img

By

Published : Jul 16, 2020, 11:46 PM IST

Updated : Jul 17, 2020, 6:12 AM IST

पालघर - जिल्ह्यातील गडचिंचले येथे जमावाने केलेल्या हल्ल्यात दोन साधू आणि एक ड्रायव्हर अशा तिघांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला, त्यानुसार सीआयडीने बुधवारी डहाणू न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून, ही घटना फक्त अफवेतून घडली असल्याचे सीआयडीने आरोपपत्रा म्हटले आहे. या घटनेनंतर अनेक राजकीय पक्षांनी जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला. पण, सीआयडीच्या तपासातून ही घटना केवळ अफवा पसरवल्यामुळे घडली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अनिल देशमुख- गृहमंत्री

सीआयडीने याप्रकरणी 808 लोकांची सखोल चौकशी करून 154 जणांना अटक केली आहे. तसेच पुढील कारवाई न्यायालयात चालेल, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

गडचिंचले येथे गावात चोर आल्याचा संशय घेत जमावाने 16 एप्रिल रोजी दोन साधू व वाहनचालकाची निर्घृण हत्या केली. या हत्येने सर्वत्र खळबळ उडाली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गृह विभागाने हे प्रकरण सीआयडीकडे सोपवले. या प्रकरणी 165 जणांना अटक करण्यात आली असून, यातील 11 अल्पवयीन आहेत. ही घटना 16 एप्रिल रोजी रात्री घडली. तर या प्रकरणी 17 एप्रिल रोजी गुन्ह्याची नोंद झाली होती. 90 दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल करणे क्रमप्राप्त असल्याने मुदतीत सीआयडीमार्फत हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

गडचिंचले हत्याकांड प्रकरणात कासा पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. सीआयडीने याप्रकरणी आतापर्यंत 808 संशयीतांची चौकशी केली असून, 108 जणांच्या साक्षी नोंदविल्या आहेत. पहिल्या गुन्ह्याचा (क्र. 76) तपास सीआयडीचे डीवायएसपी विजय पवार यांनी केला असून, 126 आरोपींच्या विरोधात 4 हजार 955 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. तर दुसऱ्या गुन्ह्याचा (क्र. 77) तपास गुन्हे अन्वेषण विभागाचे डीवायएसपी इरफान शेख यांनी केला असून, त्यांनीही 126 आरोपींविरोधात 5 हजार 921 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. कासा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या दोन गुन्ह्यात (गुन्हा दाखल क्र. 76/2020 व 77/2020) आरोपपत्रामध्ये समान कलमे समाविष्ट केली आहेत.

आरोपपत्रात समाविष्ट केलेली कलमे पुढीलप्रमाणे आहेत -

भारतीय दंडविधान संहितेचे कलम 302, 307, 34, 120 (ब), 109, 117, 143, 145, 147, 148, 149, 152, 153, 188, 201, 269, 270, 290, 332, 341, 342, 353, 427, 505(2) सह आपत्ती निवारण कायदा 2005 चे कलम 51(ब), 52, 54, साथरोग नियंत्रण कायदा 1897 चे कलम 2, 3, 4 व 5, महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37(1)(3), 135, महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध अधिनियम 1984 चे कलम 3 व 5.

काय आहे गडचिंचले प्रकरण -

16 एप्रिल रोजी पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर, दरोडेखोर असल्याच्या संशयातून जमावाने हल्ला करत दोन साधू व वाहनचालक अशा तिघांची हत्या केली होती. तिहेरी हत्या प्रकरणात 165 आरोपींना अटक करण्यात आली असून यातील 11 जण अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी भिवंडी येथील बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. तिहेरी हत्याप्रकरण देशभर चर्चेचा मुद्दा बनला. हे संपूर्ण प्रकरण हाताळत असताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. याप्रकरणात आतापर्यंत कासा पोलीस ठाण्यातील 2 पोलीस अधिकारी व 3 कर्मचाऱ्यांचे निलंबन तसेच 35 कर्मचाऱ्यांची जिल्ह्यात अन्य ठिकाणी बदली करण्यात आले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 7 मे रोजी गडचिंचले येथे घटनास्थळाचा दौरा केल्यानंतर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला व पालघरचे पोलीस अधीक्षक म्हणून दत्तात्रय शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. गडचिंचले तिहेरी हत्याकांडाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागातमार्फत सुरू आहे.

Last Updated : Jul 17, 2020, 6:12 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.