पालघर - लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांचा विजय झाला असून त्यांनी महाआघाडी पुरस्कृत बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांचा पराभव केला. निवडणुकीत मिळालेल्या या विजयासाठी त्यांनी पालघर जिल्ह्यातील मतदारांचे आभार मानले. तसेच विजयाचे श्रेय युतीच्या कार्यकर्त्यांना व वरिष्ठ नेतृत्त्वाला दिले असून त्यांचे आभार मानले. त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नैराश्येतून विरोधकांनी प्रचारदरम्यान माझ्यावर अनेक वैयक्तिक आरोप केले. मात्र, पालघरच्या जनतेने मला केलेल्या मतदानाच्या माध्यमातून या वैयक्तिक आरोपांचे प्रत्युत्तर दिले आहे. तसेच आजवर आपण केलेल्या विकासकामांची पोचपावती दिली आहे.
पालघर जिल्ह्यातील सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील कुपोषण, स्थलांतर, रोजगार, मच्छिमारांचे प्रश्न आदी विविध समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे, असे राजेंद्र गावित यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधताना म्हणाले.
जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार - राजेंद्र गावित
निवडणुकीत मिळालेल्या या विजयामुळे शिवसेना उमेदवार राजेंद्र गावित यांनी पालघर जिल्ह्यातील मतदारांचे आभार मानले. तसेच विजयाचे श्रेय युतीच्या कार्यकर्त्यांना व वरिष्ठ नेतृत्त्वाला दिले असून त्यांचे आभार मानले.
पालघर - लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांचा विजय झाला असून त्यांनी महाआघाडी पुरस्कृत बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांचा पराभव केला. निवडणुकीत मिळालेल्या या विजयासाठी त्यांनी पालघर जिल्ह्यातील मतदारांचे आभार मानले. तसेच विजयाचे श्रेय युतीच्या कार्यकर्त्यांना व वरिष्ठ नेतृत्त्वाला दिले असून त्यांचे आभार मानले. त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नैराश्येतून विरोधकांनी प्रचारदरम्यान माझ्यावर अनेक वैयक्तिक आरोप केले. मात्र, पालघरच्या जनतेने मला केलेल्या मतदानाच्या माध्यमातून या वैयक्तिक आरोपांचे प्रत्युत्तर दिले आहे. तसेच आजवर आपण केलेल्या विकासकामांची पोचपावती दिली आहे.
पालघर जिल्ह्यातील सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील कुपोषण, स्थलांतर, रोजगार, मच्छिमारांचे प्रश्न आदी विविध समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे, असे राजेंद्र गावित यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधताना म्हणाले.
मतदारांचे मानले आभार
Body:जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार: राजेंद्र गावित यांनी
विजयानंतर मतदारांचे मानले आभार
नामीत पाटील,
पालघर, दि.23/5/2019
पालघर लोकसभेचे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी विजय झाला असून त्यांनी महाआघाडी पुरस्कृत बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांचा पराभव केला आहे. निवडणुकीत मिळालेल्या या विषयासाठी त्यांनी पालघर जिल्ह्यातील मतदारांचे आभार मानले आहेत. तसेच विजयाचे श्रेय युतीच्या कार्यकर्त्यांना व वरिष्ठ नेतृत्व दिले असून त्यांचे आभार मानले आहेत. त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
नैराश्यातून विरोधकांनी प्रचारदरम्यान माझ्यावर अनेक वैयक्तिक आरोप केले. मात्र पालघरच्या जनतेने मला केलेल्या मतदानाच्या माध्यमातून या वैयक्तिक आरोपांचे प्रत्युत्तर दिले आहे. तसेच आजवर आपण केलेल्या विकास कामांची पोचपावती दिली आहे.
या पालघर जिल्ह्यातील सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील कुपोषण, स्थलांतर, रोजगार, मच्छिमारांचे प्रश्न आदी विविध प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. असे राजेंद्र गावित यांनी ईटीव्ही भारतची संवाद साधताना म्हटले आहे.
Conclusion: