ETV Bharat / state

महा चक्रीवादळाचे सावट; मुंबईसह उरण, रत्नागिरी येथील 34 मासेमारी बोटी डहाणू बंदरात आश्रयाला - मासेमारी बोटी डहाणू बंदरात आश्रयाला

'क्यार' आणि 'महा' ही 2 चक्रीवादळं अरबी समुद्रात घोंगावू लागल्यामुळे जिवाच्या आकांताने खोल समुद्रात गेलेल्या मासेमारी बोटी नजीकच्या बंदराकडे आश्रय घेत आहेत.

डहाणू बंदरा
author img

By

Published : Nov 3, 2019, 9:35 AM IST

पालघर - 'क्यार' आणि 'महा' ही 2 चक्रीवादळं अरबी समुद्रात घोंगावू लागले आहे. त्यामुळे खोल समुद्रात गेलेल्या मासेमारी बोटी नजीकच्या बंदराकडे आश्रयाला आल्या आहेत. 2 नोव्हेंबरच्या सायंकाळी सुमारे 34 बोटी डहाणू खाडी येथे विसावल्या आहेत. दरम्यान डहाणू तालुक्यातील विविध एकूण 258 मासेमारी बोटी सुखरूप बंदरात असल्याची माहिती डहाणू मत्स्य व्यवसाय विभागाने दिली.

डहाणू बंदर

या दोन्ही चक्रीवादळामुळे डहाणूच्या समुद्रकिनारी मासेमारी करणाऱ्या बोटी आश्रयाला आल्या आहेत. तसेच डहाणू खाडी येथे सायंकाळी चार ते साडेचारच्या सुमारास त्या विसावल्याची माहिती स्थानिक मच्छीमारांनी दिली. साधारणतः 50 नॉटिकल मैल खोल समुद्रातून वादळाचा इशारा मिळाल्यानंतर सुमारे 34 बोटी आश्रयाला आल्या आहेत. त्यापैकी मुंबई, उरण आणि रत्नागिरी येथील त्या असल्याची पुष्टी बोटीवरच्या खलाशांकडे असलेल्या नोंदणी प्रमाणपत्र आणि बायोमॅट्रिक कार्डद्वारे समोर आल्याची माहिती डहाणू बंदर निरीक्षक प्रियांका भोय यांनी दिली.

हेही वाचा - डहाणू तालुक्यात परतीच्या पावसाने भात पिकांचे नुकसान

तर, डहाणू विभागातील डहाणू, धाकटी डहाणू, झाई, वरोर, आगर, चिखले, चिंचणी आणि घोलवड आदी मच्छीमार बंदरातील एकूण 258 बोटींना सूचना दिल्यानंतर सुरक्षित बंदरात असल्याचे भोय म्हणाल्या.

हेही वाचा - पालघरमध्ये परतीच्या पावसाने भात पिकाचे नुकसान

Intro:डहाणू बंदरात 34 बोटी आश्रयाला

:मुंबई, उरण, रत्नागिरी येथील मासेमारी बोटीBody:डहाणू बंदरात 34 बोटी आश्रयाला

:मुंबई, उरण, रत्नागिरी येथील मासेमारी बोटी

पालघर/डहाणू दि. 2 नोव्हेंबर 

क्यार आणि महा ही दोन चक्रीवादळं अरबी समुद्रात घोंगावू लागल्यामुळे जिवाच्या आकांताने खोल समुद्रात गेलेल्या मासेमारी बोटी नजीकच्या बंदराकडे आश्रय घेत आहेत. शनिवार, 2 नोव्हेंबरच्या सायंकाळी सुमारे 34 बोटी डहाणू खाडी येथे विसावल्या आहेत. दरम्यान डहाणू तालुक्यातील विविध एकूण 258 मासेमारी बोटी सुखरूप बंदरात असल्याची माहिती डहाणू मत्स्य व्यवसाय विभागाने दिली.

   या दोन्ही चक्रीवादळामुळे डहाणूच्या समुद्रकिनारी मासेमारी करणाऱ्या बोटी आश्रयाला आल्या असून डहाणू खाडी येथे सायंकाळी चार ते साडेचारच्या सुमारास त्या विसावल्याची माहिती स्थानिक मच्छीमारांनी दिली. साधारणतः 50 नॉटिकल मैल खोल समुद्रातून वादळाचा इशारा मिळाल्यानंतर सुमारे 34 बोटी आश्रयाला आल्या आहेत. त्यापैकी मुंबई, उरण आणि रत्नागिरी येथील त्या असल्याची पुष्टी बोटीवरच्या खलाशांकडे असलेल्या नोंदणी प्रमाणपत्र आणि बायोमॅट्रिक कार्डद्वारे समोर आल्याची माहिती डहाणू बंदर निरीक्षक प्रियांका भोय यांनी दिली.

  तर डहाणू विभागातील डहाणू, धाकटी डहाणू,  झाई, वरोर, आगर, चिखले, चिंचणी आणि घोलवड आदी मच्छीमार बंदरातील एकूण 258 बोटींना सूचना दिल्यानंतर सुरक्षित बंदरात असल्याचे भोय म्हणाल्या.

    Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.