ETV Bharat / state

पालघर - गिरणोलीत घर जळून खाक; लाखोंचे नुकसान - palghar live update

मंगळवारी रात्रीच्या सुमारास पालघर तालुक्यातील गिरणोली गावात एका घराला अचानक आग लागली. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गावकऱ्यांनी प्रयत्न सुरू केले व अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच बोईसर येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.

fire on house at girnoli, palghar
पालघर - गिरणोलीत घर जळून खाक
author img

By

Published : May 26, 2021, 1:40 PM IST

पालघर - तालुक्यातील गिरणोली येथे एका घराला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले असून लाखोंचे नुकसान झाले आहे.

पालघर - गिरणोलीत घर जळून खाक

घराला अचानक लागली आग -

मंगळवारी रात्रीच्या सुमारास पालघर तालुक्यातील गिरणोली गावात एका घराला अचानक आग लागली. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गावकऱ्यांनी प्रयत्न सुरू केले व अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच बोईसर येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. घराला लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यात स्थानिकांच्या मदतीने अग्निशमन दलाला यश आले आहे.

लाखोंचे नुकसान -

गिरणोली येथील भावेश पाटील, प्रफुल पाटील यांच्या मालकीचे हे घर असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. घरात असणाऱ्या सर्व संसारोपयोगी वस्तू या आगीत जळल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा - 12 वीची सीबीएसई परीक्षा रद्द करा- 300 विद्यार्थ्यांचे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.