ETV Bharat / state

पालघरमध्ये पावसाने दडी दिल्याने खरीप हंगाम अडचणीत, शेतकरी चिंतातूर - palghar district

पालघर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाची एखादी सर येते. तर कुठे कोरडेपणा दिसून येतो. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील हळवे जातीच्या भात पीकाची लागवड केली आहे. आता या पिकाला पावसाची अत्यंत आवश्यकता आहे. पण येथे पावसाअभावी पिके करपून शेतकऱ्यांच्या पदरी नापिकी येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पालघरमध्ये पावसाने दडी दिल्याने खरीप हंगाम अडचणीत, शेतकरी चिंतातूर
author img

By

Published : Jul 21, 2019, 12:16 PM IST

पालघर (वाडा) - पावसाने दडी दिल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम अडचणीत आला आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांची लागवडीची कामेही रखडली आहेत. यामुळे नापिकी ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे.

पालघर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाची एखादी सर येते. तर कुठे कोरडेपणा दिसून येतो. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील हळवे जातीच्या भात पीकाची लागवड केली आहे. आता या पिकाला पावसाची अत्यंत आवश्यकता आहे. पण येथे पावसाअभावी पिके करपून शेतकऱ्यांच्या पदरी नापिकी येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पालघरमध्ये पावसाने दडी दिल्याने खरीप हंगाम अडचणीत, शेतकरी चिंतातूर

पालघर जिल्ह्यासह पावसाने उघडीप दिल्याने बळीराजा पावसाची वाट पाहत आहे. खरीप हंगाम पुढे ढकलला जाईल या भीतीने शेतकरीवर्गाने पेरणी केली. मात्र भात पेरणी केलेल्या रोपांना पाणी नाही. हंगाम साधण्यासाठी काहींनी कमी दिवसांची भात रोपे लावली. मात्र ऐन लागवडीच्या हंगामातच पावसाने दडी दिली आहे.

वाडा तालुक्यात 15 जुलै ते 18 जुलैपर्यंत प्रत्येकी 2 मिमी, 4 मिमी, 13 मिमी, 4 मिमी, असा पाऊस झाला आहे. येथील भात पिकांना पावसाची गरज असतानाच पावसाने दडी दिली. त्यामुळे लागवड केलेले भातपीक पावसाअभावी करपले तर शेतकरीवर्गावर नापिकी ओढावू शकते, अशी प्रतिक्रिया डाहे येथील शेतकरी जगदीश कोकाटे यांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना दिली.

Intro:पावसाच्या ओढीने खरीप हंगाम अडचणीत
नापिकी ओढावण्याची भीती,
शेतात पाणी साठवण्याची शेतकरीवर्गाची लगबग

पालघर (वाडा)संतोष पाटील
पावसाने दडी मारल्याने शेतकरीवर्गाचा खरीप हंगाम अडचणीत आला आहे. पावसाअभाावी शेतकरीवर्गाचीी लागवडीची कामे रखडली आहेत. पालघर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पर्जन्यमान कमी आहे.अधून मधून एखादी पावसाची सर कोसळत असते तर कुठे कोरडेपणा दिसुन येतो.अशातच खरीप हंगामातील हळवे जातीचे भात पिके शेतकरीवर्गाने लागवड केली आहे. मात्र या लागवडी पिकांना व पेरलेल्या भात रोपांना पावसाची गरज आहे.पण येथे पावसाअभावी पिके करपूून जाऊन शेतकऱ्यांच्या पदरी नापिकी येण्याची भीती शेतकरीवर्ग व्यक्त करण्यात येतेय.
पालघर जिल्ह्लयासह पावसाने उघडीप दिल्याने बळीराजा पावसाच्या चिंतेत आहे. खरीप हंगाम पुढे ढकला जाईल या भीतीने शेतकरीवर्गाने पेरणी केली.माञ भात पेरणी केलेल्या रोपांना पाणी नाही.हंगाम साधण्यासाठी काहींनी कमी दिवसाचे भात रोपे लावली. आज लागवडीचा हंगाम जोर पकडला असताना पावसाने ओढ दिली आहे.भात
लागवडीसाठी शेतकरीवर्गाने शेताची बांधबंधीस्ती करून पाणी अडवण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
वाडा तालुक्यात 15 जुलै ते 18 जुलैपर्यंत 2 मिमी,4 मिमी,13 मिमी,4 मिमी असे दिवसभारातील पर्जन्यमान आहे.
इथल्या भात पिकांना पावसाची गरज असताना पावसाने ओढ दिली आहे.त्यामुळे लागवडी केलेले भातपिक पावसाअभावी करपून जाऊन शेतकरीवर्गावर नापिकी ओढावू शकते.अशी प्रतिक्रीया डाहे येथील शेतकरी जगदीश कोकाटे यांनी
ईटिव्हीशी बोलताना माहीती दिली.
पावसाच्या ओढीने इथला खरीप हंगाम अडचणीत आला आहे.Body:OkConclusion:Ok
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.