ETV Bharat / state

पालघरच्या दहा गावांतील पाण्याचे स्त्रोत दुषित, नागरिकांचे जीव धोक्यात

तारापूर येथील औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यातून निघणाऱ्या सांडपाण्यामुळे बोईसरसह आसपासच्या दहा गावातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दुषित झाले आहे. यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे.

contaminated water
दुषित पाणाी
author img

By

Published : Nov 30, 2019, 10:54 AM IST

Updated : Nov 30, 2019, 12:09 PM IST

पालघर - तारापूरच्या तारापूर औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमधून निघणारे सांडपाणी आणि रासायनयुक्त पाणी राजरोसपणे परिसरातील शेती तसेच नैसर्गिक नाल्यांमध्ये सोडून नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. त्यामुळे परिसरातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत दुषित झाले असून नागरिकांना अनेक आजार जडू लागले आहेत.

माहिती देताना सरपंच आणि उपसरपंच

तारापूर औद्योगिक वसाहतीत साडेबाराशेहून अधिक कंपन्या असून, या कंपन्यांमधून निघणारे रसायनयुक्त सांडपाणी राजरोसपणे परिसरातील नागरिकांच्या शेतीत तसेच नैसर्गिक नाल्यांमधून परिसरात सोडले जात आहे. त्यामुळे बोईसरसह परिसरातील आठ ते दहा गावांमधील पाण्याचे स्रोत दूषित झाले आहेत. दूषित झालेल्या पाण्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. सर्दी, ताप, डोकेदुखी, घसा दुखणे, अंगाला खाज, सांधे दुखी यासारख्या अनेक आजारांना ग्रामस्थांना तोंड द्यावे लागत आहे.

काही दिवसांपूर्वी कुंभवली नाका येथे असलेला बीपीटी प्लांट फुटल्याने या प्लांटमधील रसायनयुक्त पाणी परिसरात पसरले. हे पाणी गावातील पाण्याच्या स्त्रोतात गेल्याने विहिरी, कूपनलिका यांचे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी गावातील विहिरी आणि कूपनलिकेतून यांच्यातून येणाऱ्या पाण्याचा वापरही बंद केला आहे. त्यामुळे या भागातील चार ते पाच हजार नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांना टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसी यांच्याकडे वारंवार तक्रारी अर्ज करून देखील दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा - उघड्या गटारात पडून ४ वर्षीय बालकाचा मृत्यू ; विरारच्या अर्नाळा बंदरपाडा येथील घटना

Intro:तारापूर औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमधून निघणारे सांडपाणी आणि रासायनिक केमिकलयुक्त पाणी राजरोसपणे परीसरातील शेती तसेच नैसर्गिक नाल्यांमध्ये सोडून नागरिकांच्या जीवाशी होतोय खेळ Body:       तारापूर औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमधून निघणारे सांडपाणी आणि रासायनिक केमिकलयुक्त पाणी राजरोसपणे परीसरातील शेती तसेच नैसर्गिक नाल्यांमध्ये सोडून नागरिकांच्या जीवाशी होतोय खेळ 

नमित पाटील,
पालघर, दि.29/11/2019

      बोईसर येथील तारापूर औद्योगिक वसाहतीतील  कंपन्यांमधून निघणारे सांडपाणी आणि रासायनिक केमिकलयुक्त पाणी राजरोसपणे परिसरातील शेती तसेच नैसर्गिक नाल्यांमध्ये सोडले जात असून नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचे भयाण वास्तव समोर आले आहे. त्यामुळे परिसरातील पिण्याचे पाण्याचे स्रोत दूषित झाले असून नागरिकांना अनेक आजार जडू लागले आहेत.

     तारापूर औद्योगिक वसाहतीत साडेबाराशेहून अधिक  कंपन्या असून, या कंपन्यांमधून निघणारे रासायनिक केमिकलयुक्त सांडपाणी राजरोसपणे परिसरातील नागरिकांच्या शेतीत तसेच नैसर्गिक नाल्यांमधून परिसरात सोडले जात आहे. त्यामुळे  बोईसरसह परिसरातील आठ ते दहा गावांमधील पाण्याचे स्रोत दूषित झाले आहेत.  दूषित झालेल्या पाण्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते . सर्दी, ताप, डोकेदुखी, घसा दुखणे, अंगाला खाज, सांधे दुःखी यासारख्या अनेक आजारांना ग्रामस्थांना तोंड द्यावे लागत आहे.  काही दिवसांपूर्वी कुंभवली नाका येथे असलेला बीपीटी प्लांट फुटल्याने या प्लांटमधील केमिकल युक्त पाणी परिसरात पसरले. हे केमिकलयुक्त रासायनिक पाणी गावातील पाण्याच्या स्त्रोतात गेल्याने विहिरी कूपनलिका यांचे पाणी दूषित झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी गावातील विहिरी आणि कूपनलिका यांच्यातून येणाऱ्या पाण्याचा वापरही बंद केला आहे. त्यामुळे या भागातील चार ते पाच हजार नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांना बिसलेरी तसेच टॅंकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. 

    महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एम.आय.डी.सी यांच्याकडे वारंवार तक्रारी अर्ज करून देखील दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील स्थानिकांकडून करण्यात येत आहे. 

Byte: - 

1) रुपाली पिंपळे,सरपंच

2)राहुल संखे,उपसरपंच

3)संदीप संखे,माजी उपसरपंच

4 )सशीबाई संखे, अंगणवाडी सेविका

Conclusion:
Last Updated : Nov 30, 2019, 12:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.