पालघर - तीन ते चार दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यामुळे तूर, हरभरा, कापूस आणि भाजीपाला आदी पिकांना मोठा फटका बसला आहे. यावर्षी अवकाळी पाऊस झाल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला. त्यातून सावरलेल्या शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचे संकट उभे राहिले, तर आता ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचेही नुकसान झाले आहे.
तोंडाशी आलेले पीक जाणार -
ढगाळ वातावरणामुळे आंब्याचा मोहर करपून जात आहे. त्याचबरोबर मूग, हरभरा, वाल, तूर, पिकांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक हातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पिकविमा देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.