ETV Bharat / state

वसईत आढळला कोरोनाचा एक रुग्ण, राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 97 वर

author img

By

Published : Mar 23, 2020, 11:35 PM IST

Updated : Mar 24, 2020, 12:17 PM IST

दिवसेंदिवस कोरोनाचे संकट वाढतानाच दिसत आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेय. वसईत पहिला कोरोनाचा पॉजिटीव्ह रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे राज्यात आता कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ही 97 झाली आहे. २० मार्चला शिपवर काम करणारा हा रुग्ण ऑस्ट्रेलियातून मुंबईत दाखल झाला होता.

Corona patient found in Vasai
वसईत आढळला कोरोनाचा एक रुग्ण

पालघर - दिवसेंदिवस कोरोनाचे संकट वाढतानाच दिसत आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेय. वसईत पहिला कोरोनाचा पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे राज्यात आता कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 97 झाली आहे. २० मार्चला शिपवर काम करणारा हा रुग्ण ऑस्ट्रेलियातून मुंबईत दाखल झाला होता.

वसईत आढळला कोरोनाचा एक रुग्ण

या रुग्णाने एअरपोर्टवर आल्यावर आपल्याला त्रास होत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर तो वसईत नातेवाईकांकडे आला होता. त्याला अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात पुढील तपासासाठी दाखल करण्यात आलं. आज त्याचे कोरोना तपासणीचा रिपोर्ट पोसिटीव्ह आला असल्याचे वसई विरार महापालिकेककडून स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर वसई विरारकरांनी घरीच राहून सरकारच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

Last Updated : Mar 24, 2020, 12:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.