ETV Bharat / state

सफाळेत कमी खर्चात होतोय समान दाबाने पाणीपुरवठा; देशातील पहिलाच प्रकल्प - आयआयटी मुंबई न्यूज

2 लाख रुपये खर्चून उभारलेल्या या पहिल्या शाफ्टमुळे सफाळे डोंगरी भागातील पाच हजारांहून अधिक नागरिकांनी याचा लाभ होणार आहे. विशेष म्हणजे अत्यंत साध्या तंत्रज्ञानावर हा प्रकल्प आधारित असून त्याचे सर्व फेब्रिकेशन व उभारणी सफाळे येथील तंत्रद्न्य व नागरिकांच्या मदतीने करण्यात आला असल्याने हा प्रकल्प खऱ्या अर्थाने गाव पातळीवर आत्मनिर्भर आहे.

सफाळेत कमी दाबाने समान पाणी पुरवठा
सफाळेत कमी दाबाने समान पाणी पुरवठा
author img

By

Published : Mar 9, 2021, 4:09 PM IST

Updated : Mar 9, 2021, 7:48 PM IST

पालघर- तालुक्यातील सफाळे-उंबरपाडा ग्रामपंचायतीत कमी खर्चात संपूर्ण गावाला समान दबाने पाणीपुरवठा करण्याचे तसेच अत्यंत कमी जागेत उभी राहणारी पाणी वितरण व्यवस्था आयआयटी मुंबईच्या मदतीने कार्यान्वित करण्यात आहे. देशात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व इतर पाणी पुरवठा करणाऱ्या संस्थांनी विविध ग्रामपंचायतीमध्ये या तंत्रज्ञानाचे अनुकरण करण्याची शिफारस केंद्रीय स्वछता व पाणीपुरवठा विभागाने केली आहे.

सफाळेत कमी खर्चात होतोय समान दाबाने पाणीपुरवठा

देशातील पहिलाच प्रकल्प
५० हजार ते एक लाख लिटर क्षमतेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील पाण्याच्या टाकीला उभारण्यासाठी १० ते २० लाख रुपयांंचा सर्व साधारणपणे खर्च येत असतो. मात्र, वितरण व्यवस्थेत समदाब निर्माण करून 'शाफ्ट' ही दोन पाईपमधून पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पूर्वीच्या काळामध्ये वापरल्या जाणाऱ्या 'खांब' या तंत्रज्ञानाचे आयआयटी मुंबईच्या शहरी विज्ञान व अभियांत्रिकी विभागाच्या अभियंते व मार्गदर्शक प्रा. प्रदीप काळबर यांनी सफाळे येथे अंमलात आणली आहे.

देशांतर्गत उपलब्ध असलेल्या या तंत्रज्ञानाचा प्रसार गरज
सुमारे 2 लाख रुपये खर्चून उभारलेल्या या पहिल्या शाफ्टमुळे सफाळे डोंगरी भागातील पाच हजारांहून अधिक नागरिकांनी याचा लाभ होणार आहे. विशेष म्हणजे अत्यंत साध्या तंत्रज्ञानावर हा प्रकल्प आधारित असून त्याचे सर्व फेब्रिकेशन व उभारणी सफाळे येथील तंत्रद्न्य व नागरिकांच्या मदतीने करण्यात आला असल्याने हा प्रकल्प खऱ्या अर्थाने गाव पातळीवर आत्मनिर्भर आहे. या प्रकल्पाच्या उभारणीत सफाळे ग्रामपंचायतीच्या सदस्य तसेच नागरिकांचा सक्रिय सहभाग आहे. या गावामध्ये असलेल्या पाणीपुरवठा व्यवस्थित अशा प्रकारची तीन जलवाहिन्यांना शाफ्ट, मनिफॉल्ड व मास्टरपीस अशी उपकरणे बसवण्याचे काम सुरू असून त्याचे अनुकरण वेगवेगळ्या ठिकाणी केल्यास अत्यंत कमी खर्चात पाणीपुरवठा व्यवस्था उभारली जाऊ शकते तसेच बंद अडलेल्या पाणीपुरवठा योजना बळकट होऊन त्यांना संजीवनी मिळू शकेल.

पाण्याच्या टाकीला किफातयतशीर पर्याय
पाण्याला पुरेसा दाब मिळण्यासाठी पाण्याची टाकी उभारण्याची संकल्पना गेल्या काही वर्षांपासून विचारात होती. मात्र, या टाक्यांमध्ये कालांतराने होणारी गळती व इतर तांत्रिक अडचणींचा परिणाम नळ पाणी योजनेवर झाल्याचे राज्यात व देशात अनेक उदाहरण आहेत. खांबाच्या आकाराचा शाफ्ट कमी खर्चात उभारून सर्व वाहिन्यांवर समदाब निर्माण करण्याची क्षमता असलेले तंत्रज्ञान देशात पूर्वापार वापरले जात असे. त्याचे अनुकरण व प्रात्यक्षिक सफाळे येथे करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाचा सर्व ग्रामीण नळपणी योजनांमध्ये वापर करावा, असे केंद्रीय पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या संचालकाने राज्याच्या प्रधान सचिवांना पत्राद्वारे कळवले आहे. पाणीपुरवठा क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञान शोधण्यासाठी परदेशी वाऱ्या करणाऱ्या मंडळींना देशांतर्गत उपलब्ध असलेल्या या तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याची आता खऱ्या अर्थाने गरज आहे, हे या प्रकल्पाने दाखवून दिले आहे.

Last Updated : Mar 9, 2021, 7:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.