ETV Bharat / state

पालघरमध्ये आदिवासी विकास महामंडळाच्या भात खरेदी केंद्रांचा सावळागोंधळ - palghar breaking news

पालघरमधील आदिवासी विकास महामंडळाच्या भात खरेदी केंद्रांचा सावळागोंधळ सुरू आहे. याचा मोठा फटका येथील शेतकर्‍यांना बसत आहे.

भात खरेदी केंद्र
भात खरेदी केंद्र
author img

By

Published : Jan 4, 2021, 3:56 PM IST

पालघर - पालघरमधील आदिवासी विकास महामंडळाच्या भात खरेदी केंद्रांचा सावळागोंधळ सुरू आहे. याचा मोठा फटका येथील शेतकर्‍यांना बसत आहे. 32 क्विंटल उत्पादन येत असल्याचा अहवाल असतानादेखील 18 क्विंटल भात खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांचा उर्वरित भात शिल्लक राहत आहे. त्यामुळे उर्वरित भात विकायचा कुठे?, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

आदिवासी विकास महामंडळ

32 क्विंटल उत्पादनाचा अहवाल -

पालघर जिल्ह्यात भात हे मुख्य पीक असून जवळपास 75 हजार हेक्ट क्षेत्रावर भात पिकाची लागवड केली जाते. मात्र शासनाकडून आदिवासी विकास महामंडळामार्फत भात खरेदी केंद्रांवर सध्या हेक्टरी 18 क्विंटलची मर्यादा (1800 किलो ) असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. जिल्ह्यातील प्रति हेक्टर मागील सरासरी उत्पादन हे 18 क्विंटल असले तरीही प्रत्यक्षात जास्तीत जास्त उत्पादन हे 32 क्विंटलपर्यंत येत असल्याचा अहवाल या महामंडळाला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.

भात खरेदी मर्यादा वाढविण्याची मागणी-

हेक्टरी 32 (3200 किलो ) क्विंटल भात खरेदी करावा, असा स्पष्ट लेखी अहवाल कृषी विभागाचा आहे. प्रत्यक्षात मात्र या महामंडळाच्या भात खरेदी केंद्रांवर फक्त 18 क्विंटल भात खरेदी केले जात असल्याने शेतकऱ्यांचे उर्वरित भात शिल्लक राहणार आहे. महामंडळामार्फत भात खरेदी होत असल्याने व्यापारी याकडे फिरकत नाही. परीणामी उर्वरित भात विक्री करायच कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा असल्याने शेतकरी आता दुहेरी संकटात सापडला आहे. त्यामुळे ही खरेदी मर्यादा 18 क्विंटल वरून 32 क्विंटल करण्यात यावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा- बांधकाम व्यावसायिक खंडणी प्रकरणी छोटा राजनला दोन वर्षांची कैद!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.