पालघर - मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघरमधील चारोटी येथे बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. या महामार्गावरून गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका कारने अचानक पेट घेतला.
या कारमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अचानक लागलेल्या या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेले नाही.
हेही वाचा - मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सायलेंट रिसॉर्टजवळ हेल्मेटधारक दुचाकीस्वाराचा जीवघेणा गोळीबार