ETV Bharat / state

अर्नाळा किल्ला येथे नांगरलेल्या बोटीचे दोर तुटून बोटी आदळल्या किनाऱ्यावर - पालघर जिल्हा बातमी

अर्नाळा किल्ल्यातील समुद्र किनाऱ्यावर मच्छिमार बांधवांनी बोटी नांगरून ठेवल्या होत्या. मात्र, वादळी वाऱ्यासह मोठ्या लाटा धडकल्यामुळे बोटींचे दोर तुटून बोटी थेट किनाऱ्याला आदळल्या. यामुळे बोटींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : May 17, 2021, 5:24 PM IST

Updated : May 17, 2021, 6:45 PM IST

पालघर (वसई) - अर्नाळा किल्ल्यातील समुद्र किनाऱ्यावर मच्छिमार बांधवांनी बोटी नांगरून ठेवल्या होत्या. मात्र, रविवारी (दि. 16 मे) मध्यरात्री वादळी वाऱ्यासह धडकलेल्या मोठे मोठ्या लाटां व वादळामुळे बोटींचे दोर तुटून बोटी थेट किनाऱ्यावर आदळून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अर्नाळा किल्ला येथे नांगरलेल्या बोटीचे दोर तुटून बोटी आदळल्या किनाऱ्यावर

भारतीय हवामान खात्याने कोकण किनारपट्टीच्या भागात येत्या दोन चार दिवसात तौक्ते चक्रीवादळ येण्याचा इशारा देण्यात आला होता. या चक्रीवादळाच्या इशाऱ्यामुळे वसईतील खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांच्या बोटी शनिवारी (दि.15मे) समुद्र किनाऱ्यावर नांगरून ठेवल्या होत्या.

रविवारी (दि. 16 मे) मध्यरात्रीपासून वादळी वारे, रिमझिम पाऊस यासह समुद्रात मोठं मोठ्या लाटा उसळण्यास सुरूवात झाली होती. या लाटांचा व वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की समुद्र किनाऱ्यावर मच्छिमार बांधवांनी नांगरून ठेवलेल्या बोटींचे दोर तुटून गेले. या बोटी किनाऱ्यावर जोराने आदळून गेल्याने बोटींचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही एकदिवसीय मासेमारीसाठी जाणाऱ्याबोटीही अक्षरशः तुटून त्यांचे दोन तुकडे झाले आहेत.तर काही बोटी एकमेकांवर खडकावर आदळून गेल्याने बोटींना मोठे मोठी छिद्र पडल्याचे चित्र दिसून येत आहे. तर काही बोटींचे इंजिनही निखळून पडले आहे.

हेही वाचा - अर्नाळा समुद्रकिनारी लाटांचा मारा; पालघरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू

अर्नाळा किल्ला परिसरात मोठ्या संख्येने मच्छिमार बांधव राहत आहेत. यातील काही मच्छिमार लांबच्या पल्ल्याला मासेमारीसाठी जातात तर काही बांधव हे आपल्या छोट्या बोटी घेऊन एकदिवसीय मासेमारी जातात त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, नुकताच घोंगावलेल्या वादळामुळे अनेकांच्या बोटींचे नुकसान होऊन मोठा आर्थिक फटका बसला आहे. आधीच करोनाचे संकट आहे. त्यात आता वादळी वाऱ्याचे संकटही उभे ठाकले आहे.

हेही वाचा - तौक्ते चक्रीवादळ; वसई विरारमध्ये पावसाची हजेरी; प्रशासनाचा सर्तकतेचा इशारा

Last Updated : May 17, 2021, 6:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.