विरार (पालघर) - विरारचे आयर्नमॅन हार्दिक पाटील यांच्या घरावर झालेल्या जळत्या पेट्रोल बाटल्यांच्या हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. ज्यात स्कुटीवर आलेल्या आरोपींनी पाटील यांच्या घराच्या गेटमध्ये पेट्रोलच्या बाटल्या टाकून पळ काढला. याप्रकरणी आयर्न मॅन पाटील यांनी विरार पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
आरोपींना अटक -
या प्राप्त सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारांच्या मदतीने विरार पोलिसांनी या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर एक जण फरार आहे.
या षडयंत्रात बड्या व्यक्तींचा हात -
हार्दिक पाटील यांनी यापुढेही आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगून या षडयंत्रामागे विरारमधील बड्या व्यक्तींचा हात असल्याचा आरोप केला आहे. या घटनेचा पुढील तपास विरार पोलीस करीत आहेत.