ETV Bharat / state

टेम्पो-बस अपघातात टेम्पो पुलाखाली पडला; जीवितहानी नाही

author img

By

Published : Oct 1, 2019, 11:26 AM IST

वाडा-खोडाळा रस्त्यावर स्थानिक आगारातील बस व टेम्पो यांमध्ये अपघात झाला आहे. यामध्ये टेम्पो पुलाच्या खाली पडला असून, कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. मात्र, टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे.

वाडा -खोडाळा रस्त्यावर स्थानिक आगारातील बस व टेम्पो यांमध्ये अपघात झाला

पालघर : वाडा-खोडाळा रस्त्यावर बस व टेम्पो यांच्यामध्ये अपघात झाला आहे. यामध्ये टेम्पो पुलाच्या खाली पडला असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणात बसचा भरधाव वेग अपघाताला कारणीभूत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. या अगोदर तालुक्यातील जांभुळपाडा येथे भरधाव बस गतिरोधकावर आदळून 65 प्रवासी जखमी झाले होते.

वाडा तालुक्यातील दुर्गम भागातील वाडा-खोडाळा हा नव्याने रस्ता तयार झाला आहे. याच रस्त्यावर 30 सप्टेंबरला दुपारच्या सुमारास टेम्पो व बसचा अपघात झाला असून, अपघातात बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

हेही वाचा - जलसंधारण मंत्री सावंतांच्या गाडीने तरुणास चिरडले; संतप्त जमावाने फोडली गाडी

वाडा बस आगारातील बसेस अपघाताच्या घटना जांभुळपाडा, मांडवा, विक्रमगड तालुक्यातील वसुरी रस्त्यावरील शेलपाडा अशा ठिकाणी आजवर झाल्या आहेत. वसुरी येथील अपघातात वयोवृद्ध पादचाऱ्याला उडवल्याने त्याचा मृत्यू झाला होता.

Intro:वाडा बसेस अपघात मालिका संपे" ना
टेम्पो -बस अपघात, जीवितहानी नाही
पालघर -संतोष पाटील
पालघर जिल्ह्य़ातील वाडा आगारातील बसचा वाडा -खोडाळा रस्त्यावर बस आणि टेम्पो यांच्यात अपघात झाला. यात टेम्पो पुलाच्या खाली पडला असुन कुठलीही जीवीत हानी नाही. मात्र टेम्पोचे नुकसान झाले आहे.
वारंवार होणाऱ्या बस अपघाताची मालिका काही कमी होत नाही. वाडा बस आगाराच्या बसचा भरधाव वेग काही बस अपघाताला कारणीभूत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जाते. या अगोदर तालुक्यातील जांभुळपाडा येथे भरधाव बसचा स्पिडब्रेकरवर आदळून 65 प्रवासी जखमी झाले होते.
वाडा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील वाडा-खोडाळा हा नव्याने रस्ता तयार झाला आहे. रस्त्यावर टेम्पो व बसचा अपघात 30 सप्टेंबर दुपारच्या सुमारास झाला असुन सुदैवाने अपघातात बस मधील गंभीर जखमी न झाल्याचे सांगितले जाते मात्र टेम्पो हा पुलाच्या खाली कोसळला.
वाडा बस आगाराच्या बसेस अपघाताच्या घटना जांभुळपाडा, मांडवा,विक्रमगड तालुक्यातील वसुरी रस्त्यावरील शेलपाडा अशा ठिकाणी आजवर झाल्या आहेत.वसुरी इथल्या अपघातात वयोवृद्ध पादचा-याला उडविल्याने त्याचा मृत्यू झाला होता.
Body:OkConclusion:Ok
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.