पालघर - समुद्र किनारपट्टीवरील सातपाटी या मच्छीमार गावाला निसर्ग वादळाचा फटका बसणार आहे. हे लक्षात घेत या गावातील तुफान पाडा या परिसरातील सुमारे 40 कुटुंबे चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरित करण्यात आली आहेत.
या चाळीस कुटुंबामधून सुमारे दीडशे नागरिकांना सातपाटीमधील राधाकृष्ण मंदिरात सुरक्षितरित्या हलवण्यात आले आहे. दरम्यान, निसर्ग चक्रीवादळ हे अलिबागमध्ये धडकले आहे.