ETV Bharat / state

ईटीव्ही भारतच्या बातमीनंतर रुग्णालयाचा संभ्रमित करणारा खुलासा, पाहा सत्य परिस्थिती - कोरोना व्हायरस बातमी

ईटीव्ही भारतने ज्या 8 वर्षीय रुग्णाचा दाखला देत बातमी केली होती त्याला कक्ष क्र. 31 मध्ये ठेवण्यात आले असल्याचे या खुलाशात म्हटले आहे. तर संशयित कोविड रुग्ण हे कक्ष क्रमांक 18 मध्ये ठेवण्यात आले असून 19 व 20 मध्ये कन्फर्म पॉझिटिव्ह रुग्ण ऑक्सिजन रहित आणि कक्ष क्र. 29 मध्ये कन्फर्म पॉझिटिव्ह रुग्ण ऑक्सिजन सह व कक्ष क्रमांक 30 मध्ये आयसीयू कक्ष आहे. खुलाशात कक्ष क्रमांक 30 मध्ये कुठल्याही कोरोना रुग्ण ठेवण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले आहे.

treatment-of-non-covid-patients-in-the-ward-of-corona-infected-patients-osmanabad
ईटीव्ही भारतच्या बातमीनंतर रुग्णालयाचा संभ्रम निर्माण करणारा खुलासा
author img

By

Published : Jul 20, 2020, 5:01 PM IST

उस्मानाबाद- तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयाचा गलथान कारभार ईटीव्ही भारतने चव्हाट्यावर आणला होता. रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्ण आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांवर एकाच कक्षात उपचार करण्यात येत असल्याची धक्कादायक बातमी 17 जुलै रोजी प्रसारित करण्यात आली होती. या बातमीचा संदर्भ देत तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयाने जणू काही घडलेच नाही असे दाखवण्यासाठी थातुर-मतुर खुलासा सादर करत संभ्रम निर्माण केला आहे.

ईटीव्ही भारतच्या बातमीनंतर रुग्णालयाचा संभ्रम निर्माण करणारा खुलासा

ईटीव्ही भारतने ज्या 8 वर्षीय रुग्णाचा दाखला देत बातमी केली होती त्याला कक्ष क्र. 31 मध्ये ठेवण्यात आले असल्याचे या खुलाशात म्हटले आहे. तर संशयित कोविड रुग्ण हे कक्ष क्रमांक 18 मध्ये ठेवण्यात आले असून 19 व 20 मध्ये कन्फर्म पॉझिटिव्ह रुग्ण ऑक्सिजन रहित आणि कक्ष क्र. 29 मध्ये कन्फर्म पॉझिटिव्ह रुग्ण ऑक्सिजन सह व कक्ष क्रमांक 30 मध्ये आयसीयू कक्ष आहे. खुलाशात कक्ष क्रमांक 30 मध्ये कुठल्याही कोरोना रुग्णाला ठेवण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले आहे.

ईटीव्ही भारतने ज्या लहान 8 वर्षीय रुग्णाचा संदर्भ दिला होता याला कक्ष क्रमांक 31 मध्ये ठेवण्यात आले असल्याचे सांगितले आहे. मात्र ईटीव्ही भारतकडे असलेल्या व्हिडिओमध्ये कक्ष क्रमांक 30 या आयसीयूमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या बाजूच्या बेडवरती हा आठ वर्षीय मुलगा असून इतर रुग्ण एकत्र असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सर्दीचा त्रास असलेला हा आठ वर्षीय मुलगा आणि इतर रुग्ण रविवारी दुपारचे 4 वाजेपर्यंत एकाच कक्षात म्हणजे क्रमांक 30 मध्ये असल्याचे मुलाच्या वडिलांनी सांगितले होते.

व्हिडिओमध्ये कक्ष क्रमांक 30 मधील रुग्ण येथील कर्मचारी बाहेर काढत असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर पॉझिटिव्ह रुग्णाला, आपण पॉझिटिव्ह आहात का, असेही विचारल्याचे व्हिडिओमध्ये ऐकण्यात येत असून हा रुग्ण होकारार्थी मान हलवत मी, पॉझिटिव्ह असल्याचे सांगत आहे. तर तीन दिवसांपूर्वी माझा (स्वॅब) घेतला असल्याचे सांगत असून सिम्टम्स नसल्यामुळे मला इतर कक्षातही ठेवण्यात आले असल्याचे सांगत आहे. त्यामुळे रुग्णालयांने केलेला खुलासा संशय निर्माण करणारा असून याबाबतीत जिल्हाधिकारी यांनी दखल घेऊन या प्रकरणाची त्रयस्थ समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

17 जुलैची बातमी- धक्कादायक! कोरोनाबाधित रुग्णांच्या कक्षात इतर आजारांच्या रुग्णांवर उपचार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.