ETV Bharat / state

कळंब तालुक्यात तोतया पोलिसाला अटक

लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस असून ऐका वर्तमानपत्राचा पत्रकार असल्याचे सांगत ऐका भामट्याने शेतकऱ्याला गंडवले आहे.

तोतया पोलीसाला अटक
तोतया पोलीसाला अटक
author img

By

Published : Jan 1, 2021, 6:25 PM IST

Updated : Jan 1, 2021, 10:52 PM IST

उस्मानाबाद - तोतया पोलिसाला गावकऱ्यांनी चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस असून ऐका वर्तमानपत्राचा पत्रकार असल्याचे सांगत ऐका भामट्याने शेतकऱ्याला गंडवले आहे. मात्र हे प्रकरण त्याच्या चांगलेच अंगलट आले आहे. विशाल काळे, असे या आरोपीचे नाव आहे. मी उस्मानाबाद पोलिसात कार्यरत आहे. साहेबांनी वसुलीसाठी पाठविले असल्याची बतावणी करून विशाल काळे याने 10 हजार रुपये रोख व दोन मोबाईल हडपले होते. ही घटना कळंब तालुक्यातील इटकुर येथे घडली.

काय आहे प्रकरण?-

वाशी तालुक्यातील मांडवा येथील विशाल अनिल काळे हा पोलिसांचा टी-शर्ट घालून इटकुर येथील नारायण गंभीरे या शेतकऱ्याच्या घरी आला. संबंधित तोतया व्यक्तीच्या कंबरेला बनावट पिस्तुल होती. घरी येऊन आपण उस्मानाबाद पोलिसात कार्यरत आहे तसेच पत्रकार असून मला साहेबांनी तुमच्याकडे पाठविले आहे. तुम्ही अवैध धंदे करीत आहात. हे सर्व साहेबांना माहीत आहे. त्यामुळे तडजोड करा आता 50 हजार रुपये द्या, नाहीतर कळंब पोलिसात तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल करीन अशी धमकी दिली.

विशाल काळे विरुद्ध गुन्हा दाखल-

शेतकरी नारायण गंभीरे घाबरले आरोपी त्यांच्या खिश्यातील 10 हजार रुपये घेऊन गेला. त्यानंतर हा भामटा पुन्हा इटकुरला येऊन गंभीरे यांच्या घरी आला. दारात बसलेल्या संतोष गंभीरे व नारायण गंभीरे यांना 40 हजार द्या, नाहीतर पोलीस ठाण्यात चला तुम्हाला साहेबांनी बोलविले आहे, असे सांगून या दोघांच्या खिश्यातील मोबाईल घेऊन जात असताना लोकांना संशय आला. यावेळी गावकऱ्यांनी विशाल काळे या तोतयाला अडवून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी विशाल काळे विरुद्ध कलम- 384,170,171 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तोतया जवळ आढळले पोलीस आणि पत्रकार असलेले आयडी कार्ड-

विशाल काळे या तोतया जवळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते यांच्या नावाचे आयडी कार्ड आढळले. तर ऐका नामांकित वर्तमान पात्राचे रिपोर्टरचे कार्ड पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच याच्याकडे पोलिसांसारखा टीशर्ट मिळून आला असून हा दुचाकीला पोलीस सायरन बसवत असल्याचे निदर्शनास आले.

हेही वाचा- अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या एकत्र कार्यक्रमावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी

Last Updated : Jan 1, 2021, 10:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.