ETV Bharat / state

उस्मानाबाद जिल्ह्यात पंधरा दिवसात रोखले तीन बाल विवाह

उस्मानाबाद जिल्ह्यात 14 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत बालसुरक्षा पंधरवडा राबविण्यात आला होता. या काळात जिल्ह्यातील तीन बालविवाह रोखण्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांना यश आले आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Dec 5, 2020, 4:52 PM IST

उस्मानाबाद - महिला व बालविकास विभागाला जिल्ह्यातील बाल विवाह रोखण्यात यश आले आहे 14 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत बालसुरक्षा पंधरवडा राबविण्यात आला होता. या 15 दिवसांत प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी होत असलेले तीन बालविवाह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी रोखले आहेत.

माहिती देताना बाल विकास प्रकल्प अधिकारी

जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण अधिक आहे. बाल विवाह संबंधीची योग्य ती माहिती प्रशासनापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे बालविवाहाचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. सातत्याने कार्यवाही करूनही छुप्या पद्धतीने बालविवाह लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. ग्रामीण भागात याचे प्रमाण जास्त आढळले आहे. मात्र, नुकत्याच राबविलेल्या मोहिमेत शहरी, निम्नशहरी आणि ग्रामीण भागात बालविवाहाचा प्रयत्न होत असल्याचे समोर आहे. बालसुरक्षा पंधरवड्यात बालविकास विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एकात्मिक बाल विकास अधिकारी अनिल कांबळे व जिल्हा बालसंरक्षण अधिकारी ए.बी. कोवे यांनी स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मदतीने जिल्ह्यात 3 बालविवाह रोखण्यात यश आले.

सुर्डी, अणदूर, उस्मानाबाद शहरातील देवकते गल्ली येथे असे बालविवाह आयोजित केले होते. मात्र, ग्रामसेवक, सामाजिक कार्यकर्ते, अंगणवाडी कार्यकर्ती, स्थानिक गावकरी, पोलीस व अन्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे विवाह रोखण्यात आले. यानंतर वधू-वरांच्या कुटुंबांचे समुपदेशन करण्यात आले. त्यांना कायद्याची माहिती देऊन. पंचनामा करून संबधित लोकांकडून हमीपत्र घेऊन मुलीचे वय 18 व मुलाचे 21 झाल्यानंतरच विवाह करण्याची सूचना देण्यात आल्या.

हेही वाचा - दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानीचा "रात्रभर आत्मक्लेश जागर गोंधळ"

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.