ETV Bharat / state

तुळजापुरातील अवैध धंद्यांना पोलिसांचे अभय; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा आरोप - तुळजापूर क्राईम न्यूज

महागड्या मोबाईलसह सोन्याची चेन, महिलांचे मंगळसूत्र असे मौल्यवान दागिने आणि वस्तूंची चोरी केली जाते. मात्र, यात बहुतांश मोबाईल चोरीप्रकरणी गुन्हे दाखल केले जात नसून तक्रार देण्यासाठी येणाऱ्याला तसेच परत पाठवले जात असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत.

तुळजापूर ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाच्या आशीर्वादानेच मोबाईल चोरीचा धंदा तेजीत

author img

By

Published : Oct 18, 2020, 6:17 PM IST

उस्मानाबाद - तुळजापूर शहरात सध्या मोबाईल चोरीसह अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असून हे सर्व धंदे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आयोजकांनी केला आहे. तुळजाभवानी मातेच्या मंदिरात देशभरातून लाखो भाविक दररोज दर्शनासाठी येतात. याच गर्दीचा फायदा घेऊन काही भुरटे चोर चोरी करतात. महागड्या मोबाईलसह गळ्यातील सोन्याची चैन, महिलांचे मंगळसूत्र असे मौल्यवान दागिने आणि वस्तूंची चोरी केली जाते. मात्र, यात बहुतांश मोबाईल चोरीप्रकरणी गुन्हे दाखल केले जात नसून तक्रार देण्यासाठी येणाऱ्याला तसेच परत पाठवले जात असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत.

मराठा क्रांती ठोक मोर्चादरम्यान मोबाईल चोरी -

तुळजापूर शहरात मराठा क्रांती ठोक मोर्चाचे 9 ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले होते. या मोर्चादरम्यान आलेल्या लोकांच्या गळ्यातील सोन्याची चैन, मोबाईल आणि पैशांची चोरी झाली होती. याप्रकरणी 15 पेक्षा अधिक लोकांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात हजेरी लावली होती. मात्र, याप्रकरणी अनेकांच्या गळ्यातील 65 ग्रॅम सोन्याचे दागिने व खिशातील रोख रक्कम असा माल चोरी केली, असाच गुन्हा दाखल झाला असून यात मोबाईल चोरी झाली यासंबंधीची कुठलाही गुन्हा नोंदवण्यात आला नसल्याचे दिसते.

ईटीव्ही भारतचा मोजो (ऑफिस फोन) चोरी -

मराठा क्रांती ठोक मोर्चादरम्यान ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी कैलास चौधरी यांचा मोजो (ऑफिस फोन) चोरीस गेला होता. याप्रकरणी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान चोरीची तक्रार देण्यासंबंधी कैलास चौधरी पोलीस ठाण्यात गेले. यावेळी कोऱ्या कागदावर नाव आणि मोबाईल नंबर लिहून घेतले. कैलास चौधरी यांच्याप्रमाणेच मोर्चात सामील झालेले मराठा बांधव मोबाईल चोरी झाल्याची तक्रार देण्यासाठी आले. मात्र, यांनादेखील कोऱ्या कागदावर नाव आणि मोबाईल नंबर लिहून पिटाळून लावले. चौधरी यांनी यासंबंधी स्वतंत्र तक्रार घ्या, अशी विनंती पोलीस निरीक्षक गवळी यांना केली. मात्र, तुमची तक्रार इतर चोरीसंबंधी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात फक्त जबाब घेतला जाईल, असे सांगून स्वतंत्रपणे तक्रार घेणे टाळले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.