उस्मानाबाद - आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शहरात 'शिवभोजन थाळी' या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. पालकमंत्री शंकर गडाख यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
राज्यभरात महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनापासून शिवभोजन थाळीच्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या माध्यमातून राज्यातील गोरगरीब जनतेला केवळ १० रुपयात गरीब कुटुंबातील लोकांना व गरजूंना पोट भरून जेवण उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीत गाजलेल्या या थाळीला मूर्त स्वरूप आले आहे, उस्मानाबादसाठी दररोज २५० थाळी विक्रीस परवानगी देण्यात आली आहे.
हेही वाचा - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचे निधन
शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथील उपाहारगृहात या योजनेचा लाभ मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शिवसेनेने १० रुपयात जेवण मिळेल, असे वचन दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी योजना म्हणूनही या शिवभोजन थाळीकडे पाहिले जात आहे. या योजनेंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यासाठी एकूण ९ लाख रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे.
हेही वाचा - धक्कादायक..! सोनारीतील 30 माकडांचा मृत्यू; कुंडातील पाण्यामुळे मृत्यूचे सावट?