ETV Bharat / state

शिवसेनेची कोंडी करण्यासाठी की वाल्याचा वाल्मिकी होण्यासाठी राणा जगजितसिंहांचा भाजपा प्रवेश? - शिवसेना

राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह पाटील हे भाजपप्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या उस्मानाबादमध्ये जोर धरत आहे. या सर्व चर्चा शहरात लावण्यात आलेल्या होर्डिंग मुळे सुरू झाल्या आहेत. होर्डिंगवर शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या घड्याळाचे चिन्ह नसल्याने पाटील हे पक्ष बदलणार आहेत का, या चर्चेला उधाण आले आहे.

जगजितसिंह पाटील यांचा भाजपप्रवेश शिवसेनेची कोंडी करण्यासाठी
author img

By

Published : Jul 25, 2019, 10:48 PM IST

Updated : Jul 26, 2019, 9:04 AM IST

उस्मानाबाद - राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य डॉ. पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील हे भाजपप्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. जगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नातून उस्मानाबाद, लोहारा या दोन तालुक्यातील शेतकऱ्यांना २०१७ या वर्षीचा पीक विमा मिळाला. तेव्हा पाटील यांचे आभार व्यक्त करण्यासाठी शहरात होर्डिंग लावण्यात आले आहेत. मात्र या होर्डिंगवर शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या घड्याळाचे चिन्ह नसल्याने राणा पाटील हे पक्ष बदलणार का या चर्चेला उधाण आले.

जुनी होर्डिंग काढून नव्याने होर्डिंग लावण्यात आले

पक्षप्रवेशाला अधिकृत दुजोरा नाही

राणा जगजितसिंह पाटील यांचे राष्ट्रवादीत चांगले स्थान आहे. भविष्यात राष्ट्रवादीची सत्ता आली तर मंत्रिपदासाठी मराठवाड्यातून राणा जगजितसिंह पाटील यांचे नाव अग्रेसर असेल. असे असले तरीही पाटील यांच्याकडून भाजपप्रवेश करणार असल्याच्या चर्चा बाबतीत अद्याप कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही. त्याचबरोबर भाजपकडूनही अद्याप पाटील यांच्या पक्षप्रवेशाबद्दल स्पष्टीकरण देण्यात आले नाही.

न्यायालयीन प्रकरणांपासून सुटकेसाठी पक्षप्रवेश ?

देशभरात गुन्हे दाखल असलेल्या पण चांगले राजकीय वजन असलेल्या व्यक्तिमत्वाचा भाजपमध्ये प्रवेश होतो आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नेत्याने जर भाजपप्रवेश केला तर, भाजपमध्ये वाल्याचा वाल्मिकी होतो असे स्पष्टीकरण भाजपकडून देण्यात येते. या अनुषंगाने डॉ.पद्मसिंह पाटील यांच्या वर शिवसेनेचे खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांची हत्या केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयात सुरू आहे. त्याचबरोबर पाटील घराण्यावर जिल्हा अतिमागास ठेवल्याचा आरोपही केला जातो. यामुळेच न्यायालयीन प्रकरणांपासून सुटकेसाठी राणा जगजितसिंह पाटील हे भाजपप्रवेश करत आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे

भाजप पाटील यांना स्वीकारेल याची शंका

भाजप आणि शिवसेनेचा जिल्ह्यातील एकमेव विरोधक म्हणून पाटील कुटुंबाकडे पाहिले जाते. भाजपकडे वाढलेला कल पाहता जिल्ह्यात भाजप मजबूत होत आहे. भाजपमध्ये विधानसभेसाठी इच्छुक असणारे भरपूर नेतेमंडळी आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपाची वाट धरली आहे. या सर्वांनीच पाटील कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप करत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजप प्रवेश केला. यामुळे भाजपमध्ये विधानसभेसाठीच्या इच्छुक उमेदवारांची गर्दी पाहता आणि घराणेशाहीचा आरोप करून राष्ट्रवादीला सोडलेल्या लोकांमुळे पाटील यांना भाजपात प्रवेश मिळेल की नाही, याबाबत शंका आहे.

शिवसेनेची कोंडी होईल

लोकसभेच्या निवडणुकी वेळी भाजपने शिवसेनेच्या जागेवर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी दावा केला होता. मात्र, शिवसेनेने ही जागा भाजपला दिली नाही. त्याचबरोबर राज्यात भाजप आणि शिवसेनेमध्ये वारंवार होणारी धुसफूस याचा वचपा काढण्यासाठी आणि शिवसेनेला शह देण्यासाठी राणा जगजितसिंह पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात येतोय का, असा प्रश्नही उपस्थित केला जातो आहे.

जगजितसिंह पाटील यांच्या पक्षप्रवेशाला अधिकृत दुजोरा नसल्याने राष्ट्रवादीकडून लावण्यात आलेले जुनी होर्डिंग काढून त्याजागी शरद पवार व राष्ट्रवादीच्या चिन्हाचा फोटो असलेले होर्डिंग नव्याने लावण्यात आले आहेत.

Intro:शिवसेनेची कोंडी करण्यासाठी किंवा वाल्याचा वाल्मिकी होण्यासाठी भाजपा प्रवेश..?

उस्मानाबाद- राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य डॉ. पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणाजगजितसिंह पाटील हे भाजपा प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. या सर्व चर्चा शहरात लावण्यात आलेल्या होर्डिंग मुळे सुरू झाल्या आहेत. राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नातून उस्मानाबाद, लोहारा या दोन तालुक्यातील शेतकऱ्यांना 2017 या वर्षीचा पीक विमा मिळाला यामुळे पाटील यांचे आभार व्यक्त करण्यासाठी शहरात होर्डिंग लावण्यात आले आहेत, मात्र या होर्डिंग वरती शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या घड्याळाचे चिन्ह नसल्याने राणा पाटील हे पक्ष बदलणार का या चर्चेला उधाण आले.

पक्षप्रवेशाचा अधिकृत दुजोरा नाही...

राणाजगजितसिंह पाटील यांचे राष्ट्रवादीत चांगले स्थान आहे. पाटील घराणे हे पवार कुटुंबियांचे जवळचे नातेवाईक आहेत. त्याचबरोबर भविष्यात राष्ट्रवादीची सत्ता आली तर मंत्रिपदासाठी मराठवाड्यातून राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव अग्रेसर असेल. राष्ट्रवादीमध्ये डॉ.पद्मसिंह पाटील व राणाजगजितसिंह पाटील यांच्या शब्दाला अढळ स्थान आहे. असे असले तरीही पाटील यांच्याकडून भाजपा प्रवेश करणार असल्याच्या चर्चा बाबतीत अद्याप कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही. त्याचबरोबर भाजपा कडूनही अद्याप राणा पाटील यांच्या पक्ष प्रवेशा बद्दल स्पष्टीकरण देण्यात आले नाही याउलट राष्ट्रवादीकडून लावण्यात आलेले जुनी होर्डिंग काढून शरद पवार व राष्ट्रवादीच्या चिन्हाचा फोटो असलेले होर्डिंग नव्याने लावण्यात येत आहेत.

वाल्याचा वाल्मिकी होण्यासाठी...?

देशाबरोबरच महाराष्ट्रात गुन्हे दाखल असलेल्या आणि त्याच बरोबर चांगले व्यक्तिमत्व असलेल्या राजकीय नेत्याचा भाजप मध्ये प्रवेश होतो आहे मात्र गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नेत्याने जर भाजपा प्रवेश केला तर, भाजपामध्ये प्रवेश घेतल्यानंतर वाल्याचा वाल्मिकी होतो असे स्पष्टीकरण भाजपाकडून देण्यात येतं या अनुषंगाने डॉ.पद्मसिंह पाटील यांच्या वरती शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे वडील पवन राजेनिंबाळकर यांची हत्या केल्याचा आरोप आहे. पवनराजे निंबाळकर व डॉ.पद्मसिंह पाटील हे एकमेकाचे बंधू आहेत. निंबाळकर यांची हत्या राजकीय वैमनस्यातून केल्याचा आरोप डॉ.पाटील यांच्या वरती केला जातो. हे प्रकरण सध्या न्यायालयात सुरू आहे. त्याचबरोबर पाटील घराण्यावरती जिल्हा अतिमागास ठेवल्याचा आरोपही केले जातात. यामुळेच वाल्याचा वाल्मिकी होण्यासाठी राणाजगजितसिंह पाटील हे भाजपा प्रवेश करत आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे

भाजपा पाटील यांना स्वीकारेल का..?

भाजपा आणि शिवसेनेचा जिल्ह्यातील एकमेव विरोधक म्हणून पाटील कुटुंबाकडे पाहिले जाते. जिल्ह्यात भाजपामध्ये अनेक मोठ्या राजकीय नेते मंडळींनी प्रवेश केला. पंचायत समिती पासून ते लोकसभेच्या निवडणुकी मध्ये भाजपाने मोलाची भूमिका बजावली आहे. भाजपाकडे वाढलेला कल पाहता जिल्ह्यात भाजपा मजबूत होत आहे. भाजपामध्ये विधानसभेसाठी इच्छुक असणारे भरपूर नेतेमंडळी आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपाची वाट धरली आहे. या सर्वांनीच पाटील कुटुंबवरती घराणेशाहीचा आरोप करत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपा प्रवेश केला. यामुळे भाजपामध्ये विधानसभेसाठी च्या इच्छुक उमेदवारांची गर्दी पाहता आणि घराणेशाहीचा आरोप करून राष्ट्रवादीला सोडलेल्या लोकांचा विचार केला तर राणाजगजितसिंह पाटील यांना भाजपा प्रवेश मिळेल का नाही याबाबत साशंकता आहे

शिवसेनेची कोंडी होईल..?

लोकसभेच्या निवडणुकी वेळी भाजप आणि शिवसेनेच्या जागेवरती लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी दावा केला होता. मात्र शिवसेनेने ही जागा भाजपला दिली नाही. त्याचबरोबर राज्यात भाजप आणि शिवसेने मध्ये वारंवार होणारी धुसफूस याचा वचपा काढण्यासाठी आणि शिवसेनेला शह देण्यासाठी राणाजगजितसिंह पाटील यांना भाजपा प्रवेश देण्यात येतोय का असा प्रश्नही उपस्थित केला जातो आहे.

Body:हे feed पुन्हा पाठवत आहे

यातील दोन्ही vis एकाच स्क्रीनमध्ये जसे आपण बाईट व vis दोन्ही एकत्र दाखवतो तसे दोन्ही vis एकत्र दाखवावे

यात दोन vis आहेत

vis001 यात शरद पवार यांचे फोटो असलेले होर्डिंग आहे

vis002 यात शरद पवार यांचा फोटो नसलेले जुने होर्डिंग आहे

Conclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
Last Updated : Jul 26, 2019, 9:04 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.